आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही, मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टाेला  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - ‘पूर्वी राजकीयदृष्ट्या आरोप केले जात असत. परंतु आता आकस मनात धरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर सतत आरोप करण्याचा  नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आमच्या सरकारने भ्रष्टाचार संपुष्टात आणला. परंतु काही जण वैयक्तिक गोष्टींमुळे काही तरी करून आरोप करण्याचा प्रयत्न करतात. त्यातही एखादा आरोप पंकजा मुंडेंच्या नावाने केला की त्याला त्वरित आणि चांगली प्रसिद्धी मिळते म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत,’  असा टाेला महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विराेधकांना लगावला.   


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी महिला बालकल्याण विभागात मोबाइल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आराेप केला हाेता. त्यावर ‘दिव्य मराठी’कडे प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या आराेपात काहीही तथ्य नाही. ज्या कंपनीचे हँडसेट खरेदी केल्याचे म्हटले जात आहे ते खरेदीच केलेले नाहीत. दुसरी गोष्ट अशी की, हे माेबाइल केवळ राज्यासाठी नाही तर देशभरात खरेदी केले आहेत आणि जेम्स पोर्टलद्वारे त्याची खरेदी झाली. यात माझा काहीही संबंध नाही. 


विभागाच्या प्रधान सचिवांनी या खरेदीवर लक्ष दिलेले आहे. यात संपूर्ण पारदर्शकता आहे. परंतु काही जण प्रसिद्धीसाठी असे नसलेले घाेटाळे शाेधून आमच्यावर आराेप करतात,’ असा टाेला त्यांनी धनंजय यांचे नाव न घेता लगावला.  ‘आरोप झाल्यावर तुम्ही लगेचच त्याचे खंडन का केले नाही?’ या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, ‘माझा त्यात थेट संबंध नसल्याने मी आरोपांचे खंडन करण्याचा प्रश्नच येत नाही. विभागाने त्याचे उत्तर दिलेलेच आहे.’

बातम्या आणखी आहेत...