आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांचे आक्रमक वक्तव्य, माझ्या बापाला काही झाले असेल तर त्या माणसाचा मी जीव घेईन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - स्व. मुंडे साहेबांना काय झालं हे माहीत असेल तर ज्यांनी केलं त्यांचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्या तपासी एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल' असे आक्रमक वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केज तालुक्यातील नांदूरघाट येथील सभेत केले. 

 

केज तालुक्यातील नांदूरघाट येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार प्रा. संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस, रमेश आडसकर, संतोष हंगे, रमेश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंकजा म्हणाल्या, 'लुच्चा - साल्या लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू एक मोठी संधी वाटते. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. या जयंत पाटलाला शोभतं का ' हे लोक म्हणतात, पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली का नाही हा विषय तुमचा नाही. जर तुम्ही छातीठोकपणे राष्ट्रवादीचे नेते आणि जे कुणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार' असेही त्या म्हणाल्या. ' त्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूवर राजकारण करायला. पंकजा मुंडेची भीती वाटते का तुम्हाला ? मी एक आवाज दिला. तर मुंबई-दिल्लीपर्यंत माझे लोक यायला तयार आहेत. माझ्या लोकांनी लाठ्या-काठ्या खाव्यात अशी यांची चाल आहे. पण असल्या भूलथापांना बळी पडू नका' असे आवाहनही पंकजा मुंडे केले. 'मी सीबीआय ऑफिसर नाही की हॅकर नाही. मी मुंडे साहेबांची लेक आहे. खालच्या पातळीवर घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालं नाही' असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. 

बातम्या आणखी आहेत...