आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खोटेपणा आणि दाभिकपणाचा मला राग आलाय', त्या वादावर पंकजा मुंडेंनी सोडले मौन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडेवर केलेल्या 'त्या' विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वादावर आता पंकजा मुंडेंनी मौन सोडलं आहे. मतदानाच्याच्या एक दिवस आधी म्हणजे आज पंकजा मुंडेंनी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "जे वक्तव्य करण्यात आले, ते महिलांचा अवमान करणारे आणि सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणार आहे. खोटेपणा आणि दाभिकपणाचा मला राग आलाय. राजकारणाची ही जी पातळी खालावली ती चीड आणणारी आहे. लोकांना खरे अश्रू आणि खोटे अश्रू कळतात. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावरही मला ते अश्रू आढळले नाही," असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक जिंकण्यासाठी त्याने एवढे अगतिक होऊ नये. आता तरी धनंजयने खोटं बोलणं बदं करावं. जर तो खरं बोलत असेल तर त्याने फेसबुकवरची आपली ती पोस्ट का डिलीट केली? तो माझ्याबाबत जे काही बोलला त्यामुळे मला त्याचा तिरस्कार वाटतोय. त्याने कोणावर आरोप केले आहेत मला माहित नाही. पण आमच्यामधील तणाव हा धनंजय मुळेच निर्माण झाला आहे. मला माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचा निसर्ग न्याय करतो. या गोष्टीचा देखील निसर्गच न्याय करेल. मी आजवर माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. माझा वडिलांचा मृत्यू, अनेक दुर्घटना मी पाहिल्या. पण आजची घटना ही निव्वळ दुर्दैवी आहे.'भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती- देवेंद्र फडणवीस


धनंजय मुंडेंच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आपण धिक्कार करतो. निवडणुकीतील पराभवाच्या भितीने टीका करताना धनंजय मुंडे यांनी किमान मर्यादा पाळायला हवी होती आणि भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी धक्कादायक विधानाबाबत धनंजय मुंडेंनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे.