आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजांच्या नेतृत्वात उपोषण, फडणवीस होणार सहभागी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात औरंगाबादेत २७ जानेवारीला सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

या उपोषणात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोअर कमिटीच्या बैठकीत लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबादेत सोमवारी होणाऱ्या उपोषणात या मागण्या

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे
  • सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी हजार कोटी अतिरिक्त द्यावेत
  • जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी
  • मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत
बातम्या आणखी आहेत...