आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशीपाेटी प्रचार, दाटून अालेल्या भावनांमुळे पंकजा मुंडेंना प्रचारसभेच्या स्टेजवरच भाेवळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - परळी येथे सभा सुरू असताना भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे अचानक चक्कर येऊन कोसळल्या. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि त्यातील शेवटची सभा असल्याने प्रत्येक नेता आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. त्याच दरम्यान, परळी विधानसभा मतदार संघात भाषण आटोपल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. परळी मतदार संघातून विधानसभा लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांची थेट बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी आहे.
 
पंकजा मुंडे यांना व्यासपीठावर भोवळ आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या कोसळल्यानंतर कार्यकर्ते आणि उपस्थित महिला नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. गर्दी टाळण्यासाठी वेळीच सुरक्षा रक्षकांनीही घेराव टाकला. तसेच वेळीच त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सुत्रांकडून समजते. दरम्यान, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने इतर नेत्यांप्रमाणे त्यांनीही आपली संपूर्ण ताकद लावली होती. सकाळपासून उपाशी पोटीच त्या प्रचार सभा आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. त्यामुळेच, भर सभेत त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.