आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये तो झाकी है, असली विकास बाकी है : पंकजा मुंडे, नेवाशाचे पालकत्व स्वीकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 शनिशिंगणापूर - सत्तर वर्षे सोगांड्यांनी जनतेला दारू, मटणाचे अामिष दाखवून सत्ता हस्तगत करत सर्वसामान्यांचे प्रपंच उद््ध्वस्त करण्याचे पाप केले. मागील साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, जलसिंचन, उज्ज्वला गॅस, सौभाग्य, घरकुल, शौचालय योजना, तसेच कर्जमाफी देऊन सर्वसामान्यांचे जीवन आम्ही उंचावले. हाच विकासाचा धागा धरून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेवासे मतदारसंघाचे पालकत्व मी स्वीकारत आहे. पुढील आमदार जय हरीच असेल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी जाहीर केले. 


सोनई येथील १११ कोटी खर्चाच्या रस्तेविकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी मंुडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बंडुभय्या चंदेल होते. जातीपातीचे विष कालवत समाजाला वेठीस ठेवण्याचे पाप काँग्रेस व राष्ट्रवादीने केल्याची टीका मंुडे यांनी केली. यापूर्वी कागदावरच कोट्यवधींचा निधी खर्च दाखवून ती हडपली जात होती. आता खरा विकास लोकांना पहायला मिळत आहे, असे त्या म्हणाल्या. भाजपला मत दिले नाही, तर आगामी दोन पिढ्या अधोगतीकडे जातील. ये तो झाकी है, असली विकास बाकी है, असे त्या म्हणाल्या. 


आमदार मुरकुटे म्हणाले, भाजपत प्रवेशासाठी अनेकांची उलघाल होत आहे. पण शिंगणापूरच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या, कर्मचाऱ्यांचा पगार कापणाऱ्या, सर्वसामान्य माणसावर अन्याय करणाऱ्यांना प्रवेश देऊ नका. तुमचा छायेचा हात आमच्या डोक्यावर असू द्या, असे म्हणत नेवासेकारांच्या वतीने त्यांनी मंुडे यांना धन्यवाद दिले. 


भानस हिवऱ्याचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. रशीद इनामदार यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव न घेता टीका केली. 

बातम्या आणखी आहेत...