आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पंकजा मुंडे या भाजपातच आहेत, त्या भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार...', महादेव जानकरांचे वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महादेव जानकर औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते

औरंगाबाद- ''पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार आणि भाजपातचं मरणार...'' असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केले. काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्याचे जाहीर केले. यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "येत्या 12 डिसेंबरला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस असतो. त्या दिवशी आम्ही सर्वच गोपीनाथ गडावर जातो. पण काहीही होणार नाही. ताईंनी फेसबुक पोस्टमध्ये मावळे म्हटलं आहे. पण आता मावळे काय आपण प्रत्येकाला लिहितो. त्या भाजपच राहणार असून त्या कधीही पक्षाच्या बाहेर पडणार नाही. एक लक्षात ठेवा, पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार हे विसरता कामा नये,'' असे जानकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...