आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं', मतदानापूर्वी पंकजा मुंडेंचे ट्विट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- विधानसभेसाठी आज आज मतदान होत आहे. भाजपच्या नेत्या आणि परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदान करण्यापूर्वी एक ट्वीट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी चार ओळी शेअर केल्यात. आमचा विजय हा निश्चित आहे. जे मनानेच हरले आहेत ते काय आमच्याशी युद्ध लढणार असा टोलाही त्यांनी त्यांचे विरोधक धनंजय मुंडे यांना लगावलाय. 

सद्य परिस्थितीत घडलेल्या घडामोडी, लोकांचे प्रेम, आत्मविश्वास आणि एक आशावाद अशा सुचक व वास्तव आशयाच्या चार ओळीतून त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच मतदानापूर्वी परळी वैजनाथ येथे जाऊन दर्शन घेतले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहीले की, "घने अंधकार को चीरते आसमान के तारे हैं। स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है। विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है । वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं ।" या कवितेतून त्यांनी आपल्या भावना तर व्यक्त केल्याच पण त्याच बरोबर विरोधकांना टोलाही लगावला.