आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें शेतमजुराच्या मुलाच्या मदतीसाठी धावून आल्या; वैद्यकीय शिक्षणासाठी दीड लाखांची मदत करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुणवत्ता असूनही बिकट आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणाचा प्रवेश अनिश्चित झालेल्या कळंब (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील शेतमजुराच्या मुलाच्या प्रवेशासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे धाऊन गेल्या आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोरख मुंडे यास 1 लाख 51 हजारांची मदत देण्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे गोरखच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे. 

भोगजी (ता.कळंब जि.उस्मानाबाद) येथील गोरख मुंडे या आईविना पोरक्या असलेल्या शेतमजुराच्या होतकरू मुलाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ‘एमबीबीएस’च्या प्रवेशासाठी प्रचंड फीस भरण्यासाठी अडचण येत होती. मेडीकल प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील 'नीट' परीक्षेत गोरखने ५०५ गुण प्राप्त केले. ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे तेथील ४ लाख ६६ हजार रूपये एवढे शैक्षणिक शुल्क व इतर खर्चाची रक्कम आगामी पाच दिवसात भरावी लागणार होती. तरच प्रवेश निश्चित होणार आहे. अशा स्थितीत गोरख व त्याचे वडील तुकाराम यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही. यामुळे होतकरू आणि हुशार मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळणार नव्हता. 
 
दरम्यान ही गोष्ट ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची तत्काळ दखल घेत या विद्यार्थ्याला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची फेसबुक पोस्ट करून संबंधित विद्यार्थ्यांने आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या मदतीमुळे गोरखचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...