आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे सरकारच्या काळातील सर्वात मोठा घाेटाळा : पी. साईनाथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे सरकारच्या कार्यकाळात होत असलेला सर्वात मोठा घोटाळा आहे. केवळ खासगी कंपन्या नफ्यात आणण्याचे काम हाेत असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कार विजेेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली.    


माजलगाव येथील पत्रकार संघाच्या वतीने दर्पण पुरस्कारांचे वितरण सोमवारी पी. साईनाथ व आमदार नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अॅड. वसंत सोळंके व गंमत भंडारी यांना पुरस्कार देण्यात आला. व्यासपीठावर नगराध्यक्ष सहाल चाऊस,  मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची उपस्थिती होती. पी. साईनाथ म्हणाले, विमा योजना ही शेतकऱ्यांची लूट असून यातून सरकारी संस्था तोट्यात गेल्या आहेत. या सरकारने खासगीकरणास मोठा वाव दिला आहे. या योजनेचा भंडाफोड झाला पाहिजे. देशातील आठ ते दहा राज्यांमध्ये दुष्काळ आहे.


 शेतकऱ्यांच्या वेदना सरकारने समजून घेऊन शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.  देशात ३  लाख १० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या असून ६५ हजार आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. मात्र शेतकरी आत्महत्यांचा अहवालही सरकारने बंद केल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला.   


विमा कंपन्यांवर नियंत्रण नाही : आमदार गोऱ्हे म्हणाल्या, विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या नाव बदलून पुन्हा  शेतकऱ्यांच्या समोर येत आहेत. ही बाब गंभीर  असून आपण सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कार्यक्रमास होती.

बातम्या आणखी आहेत...