आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 तास दहशदीत होते नागरिक, भिंत ओलांडून इमारतीवर जाउन बसला बिबट्या, व्हिडिओत पाहा बिबट्याच्या थैमान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर(राजस्थान)- पाण्याच्या शोधात एक बिबट्या शहरी वस्तीत घुसला. 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभाच्या पथकाने या बिबट्याला जेरबंद केले. सकाळी अंदाजे 6 वाजता स्कीम नंबर एक परिसरातील सीए नीरज गर्ग यांच्या 217 नंबर घराच्या तिसऱ्या मजल्यावर बिबट्याला काही लोकांनी पाहिले, आणि त्यानंतर परिसरात बिबट्याची दहशद पसरली. त्या घरातल्या स्टोर रूममध्ये बिबट्याने 6 तास थान मांडले होते. परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळताच लोकांनी त्याला पाहायला गर्दी केली. काही वेळेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


वन विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्ने केला असता, तो तेथून पळून त्याच कॉलनीतील प्लॉट नंबर 305 मध्ये घूसला आणि घरातील गाडीच्या खाली जाउन बसला. 1 तास तो तिथेच बसून राहीला. हा प्लॉट मोठा आणि मोकळा असल्याने वन विभाच्या टीमला त्याला बेशूद्धीचे इंजेक्शन मारणे सोपे झाले. त्यानंतर टीमने त्याला पिंजऱ्यात बंद केले आणि दुर जंगलात नेऊन सोडले. 

 

पारांपारिक उपकरणाच्या भरोशावर वन विभाग, साधी दोरी आणि काठी घेऊन आली होती टीम
वन विभाग आणि सरिस्का वाघ परियोजनेकडून आलेल्या टीमने पारंपारिक उपकरणांच्या साहाय्याने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागली. अधिकाऱ्यांकडे आधुनिक उपकरण नसल्याने त्यांना बिबट्याला पकडण्यात अडचणी येऊ लागल्या. इतकच काय तर त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी जाळेदेखील नवह्ते. यामुळेच बिबट्याला रस्यावर मोकळा वावरू लागला आणि लोकांना जणू त्यांच्या मृत्यू समोर असल्यासारखे वाटले.
 

बातम्या आणखी आहेत...