आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून पनवेलमध्ये महिलेस पेटवले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई  - मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरानजीक एका गावात शेजाऱ्यांनी ५५ वर्षीय महिलेस पेटवून दिले, नंतर गळफास देऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पेटवून देणाऱ्या पाच आरोपींपैकी दोन महिला असून एक अल्पवयीन तरुणी आहे. पाचही आरोपी फरार झाले आहेत. महिलेस पेटवून देण्याची गेल्या ४ दिवसांतील ही तिसरी घटना आहे. पनवेलनजीक दुंद्रे गावात गेल्या आठवड्यात शेजारील कुटंुबांनी पीडित महिलेवर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. यावरून वाद झाला होता. गुरुवारी ही महिला एकटी असल्याचे पाहून गोपाळ पाटील, हनुमंत पाटील यांनी तीन महिलांना सोबत घेऊन प्रथम या महिलेस पेटवून दिले. नंतर फासावर लटकावत आत्महत्येचा आभास निर्माण केला. अलका गोपाळ पाटील (४५), वनाबाई अर्जुन दवणे (६०), गोपाळ विट्ठल पाटील (४८), हनुमान भगवान पाटील (४२), अशी आरोपींची नावे असून आरोपींत एक अल्पवयीन तरुणीही आहे. शवविच्छेदन अहवालानंतर बोलणे योग्य : गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांना विचारले असता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू कसा झाला आहे हे समजेल. त्यानंतरच याविषयी बोलणे योग्य होईल, असे ते म्हणाले.  
 

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा वचक राहिला नाही  : भाज

एका आठवड्यात अशा चार घटना घडल्या. हा महाराष्ट्राला कलंक असून  या प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्याचा आरोप भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला आहे.