आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापांकुशा एकादशी : या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने पूर्ण होते प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार अश्विन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पापांकुशा एकादशी म्हणतात. या एकादशीला मनासारखे फळ प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. यावेळी ही एकादशी 20 ऑक्टोबर 2018 रोजी आहे. धर्म ग्रंथानुसार, जो मनुष्य कठोर तपश्चर्या करून फळ प्राप्त करतो तेच फळ या एकादशीला शेषनागावर शयन करणाऱ्या श्रीविष्णुंना नमस्कार केल्याने प्राप्त होते आणि यमलोकाचे दुःखही भोगावे लागत नाही. ही एकादशी उपवासक (व्रत करणारा)च्या मातृपक्षातील दहा आणि पितृपक्षातील दहा पितरांना विष्णू लोकात घेऊन जाते.


- अश्विन मासातील शुक्ल पक्षातील पापांकुशा एकादशीचे महत्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगिलते होते. या एकादशीला भगवान पद्मनाभाची विशेष पूजा करावी.


- जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो, त्याला निरोगी शरीर आणि सुंदर जोडीदाराची प्राप्ती होते. विवाहित व्यक्तीने हे व्रत केल्यास त्याचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धशाली होते.


- जो व्यक्ती या एकादशीला रात्री जागरण करतो, त्याला स्वर्गासमान सुखाची प्राप्ती होते.


- एकादशी व्रतामध्ये विष्णूदेवाची पूजा करण्यासाठी धूप, दीप, नारळ, फुलांचा उपयोग करावा.

 

बातम्या आणखी आहेत...