आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविभाग अधिकाऱ्यांनी हस्तगत केले काळवीटाचे कातडे, सुकलेले मांस आणि हाडे; एकास अटक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पापरी - विरवडे बु ता मोहोळ येथे आज दि 25 रोजी एका एका व्यक्तीकडे काळवीटाचे कातडे, सुकलेले मांस व हाडे आढळून आली. वन विभागाचे अधिकारी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी काळवीटेच अवशेष सापडले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी शिकारीचे साहित्य देखील मिळाले आहे.  मोहोळ वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी प्रसार माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार त्यांना विरवड़े बु येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील अतीउच्च दाबाच्या वाहिनीखाली वन्य प्राण्याची शिकारीची गुप्त माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी , कर्मचारी तसेच कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण ऊंदरे, आर एच खैरे, पी सी थोरात, के एस नायकवडी पोलिस कर्मचारी यांच्याबरोबर सदरील ठिकाणी जाउन पाहणी केली असता बाळू भीमा पवार हे राहत असलेल्या ठिकाणी काळवीट (हरिण) या वन्य प्राण्याचे कातड़े, सुकलेले मांस व हाडे मिळून आली. यासोबतच तेथे नॉयलोंन दोरिचे फाशे, वाघुर, लाकड़ी फाशे,  कुऱ्हाड, कोयता चाकू इत्यादी शिकारीचे साहित्य मिळून आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...