आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक तणावामुळे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी - पापरी (ता मोहोळ) येथे एका 19 वर्षीय तरुणाने कौटुंबिक तणावातून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पापरी येथे घडली. आकाश बाळासाहेब भोसले (19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश हा आपले आई वडील भोळसर आहेत. बहिण विवाहयोग्य झाली आहे तिचा विवाह कसा करणार, स्वतःचे घर देखील बांधलेले नाही, या कारणाने तो तणावात होता. त्यातूनच त्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चुलते मनोहर भोसले यांच्या शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
बाळासाहेब भोसले यांना आकाश हा एकुलता एक मुलगा होता, वडील बाळासाहेब व आई दोघेही भोळसर आहेत, तसेच घरात बहीण विवाहयोग्य झाली आहे, तिचा विवाह कसा करावयाचा तसेच घर ही बांधलेले नाही, या तणावाखाली आकाश कायम असायचा. तो निर्व्यसनी होता, शेतातील कामे, पशुधन सांभाळणे इत्यादी कामे तो करत होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती चुलते मोहन नारायण भोसले यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस नाईक एस.डी.पवार हे करीत आहेत.