Health / कच्ची पपई लिव्हरसाठी उत्तम, होतात इतरही खास फायदे 

कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र, कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरून तुमच्या यकृतासाठी उत्तम असते...

दिव्य मराठी वेब

Jun 15,2019 12:15:00 AM IST

कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र, कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरून तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृताजवळ परिणाम होतो. त्या वेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.


कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'अ', 'ई' आणि 'क' असते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसे यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही कच्ची पपई निराकरण करू शकते.


शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. दर वेळी व्हॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो.


कच्च्या पपईत असणारे पपीन नावाचे एंझाइम हे शक्तिवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.

X
COMMENT