आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदाचे विमान 56 मीटर उडवून अमेरिकेच्या विद्यार्थ्याने जिंकली पेपर प्लेन वर्ल्ड चॅपियनशिप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विएना(ऑस्ट्रेया)- येथे कागदाच्या विमान उडवण्याची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही स्पर्धा ऑस्ट्रेयामध्ये भरवण्यात येते. यात भारतासमवेत 61 देशातील 380 यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तीन श्रेणीमध्ये झालेल्या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी स्वतः कागदाचे विमान बनवून उडवले.

 

ही स्पर्धा अमेरिकेच्या जॅक हार्डी या विद्यार्थ्याने जिंकली. त्याने बनवलेल्या जहाजाने तब्बल 56.61 मीटरची लांबी गाठली. तसेच सर्बियाचा लेजर दूसरा आणि स्लोवेनियाचा रॉबर्ट तिसरा क्रमांक पटकावला. लेजरचे विमानाने 52.28 मीटर आणि रॉबर्टच्या विमानाने 46.36 मीटर एवढी लांबी गाठली. ऑस्ट्रियाई कंपनी रेडबूलने या स्पर्धेची सुरुवात 2006 मध्ये केली होती.


ए-4 साइजच्या पेपरपासून बनवले जाते विमान  
वर्ल्ड चॅंपिअनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आपली कीट घेऊन यावे लागते. त्यानंतर आयोजक त्यांना चांगल्या क्वालिटीचा ए-4 साइज पेपर देतात. स्पर्धकांना त्या पेपरचे विमान तयार करावे लागते. यासाठी पार्टिसिपेंट्स आपल्या किटमध्ये कात्री, चिकटटेप, डिझाइन करण्याचे सर्व सामान आणि डिंक आणू शकतात. या स्पर्धेअंतर्गत कोणतीही डिझाइन असलेले विमान उडवण्याची परवानगी दिली जाते. यादरम्यान स्पर्धक आपले विमान पाहिजे त्या पद्धतीने उडवू शकतात. जसे की, पळत जाऊन, एखाद्या प्रॉपच्या मदतीने किंवा आपल्याकडे असलेल्या कौशल्याने विमान उडवून फक्त ते जास्तीत-जास्त लांब उडवायचे असते. या वर्षी जॅकने 56.61 मीटरची लांबी गाठुन विजेतेपद पटकावले.
 

बातम्या आणखी आहेत...