आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागद रंगवणे झाले कालबाह्य, अाता अाले काेडिंगचे नवे रंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यास ड्राॅइंग बुक रंगवण्यास किंवा हाेळीच्या दिवशी रंग लावणे अावडत नसेल असा मुलगा सापडणे तसे दुर्मिळ. मुलांना चमकदार रंग खूप अावडतात. परंतु, येथे ६ वर्षांच्या मुलांची एक पिढी कलरिंगप्रमाणेच अाता काेडिंगमध्ये व्यग्र अाहे, कारण त्यांना गणितात अधिक मजा येते.  सामान्यत: या वयाेगटातील मुलांना काही खेळ प्रकाराशिवाय संगीत, चित्रकला, नाटुकले अशा बाबी शिकवल्या जातात अाणि अशा क्लासेसला ते काेचिंग क्लास म्हणतात. परंतु ही नवी पिढी अापल्या क्लासला ‘काेडिंग क्लास’ म्हणत अाहे. जेथे ही मुले अल्फाबेट नव्हे तर संगणक अाज्ञावलीची ‘एबीसीडी’ गिरवत अाहेत. अशाच एका काेडिंग क्लासचे संचालक अशाेक अनंतरमैया यांना वाटते की, काेडिंग म्हणजे मुलांना मदत करण्याची एक पद्धत अाहे. उदा. अडचण अाेळखणे, त्याचे वर्गीकरण करणे अाणि उपाय शाेधणे, जी संगणकीय प्रणालीची अाधारभूत प्रक्रिया अाहे. मुलांना हे अधिक साेपे जाते कारण ते तंत्रज्ञानाशी पूर्वीपासूनच परिचित अाहेत. काेडिंग सामान्यत: पाठ्यपुस्तकांच्या तुलनेत गणित शिकण्याची अधिक चांगली पद्धत अाहे. कारण यामध्ये सहजगत्या शिकण्याची मुलांची इच्छाशक्ती प्रबळ असते. काेटा किंवा हिसार अथवा काेणत्याही ठिकाणच्या काेचिंग क्लासेसप्रमाणे बंगळुरूमध्ये कितीतरी डझनावारी काेडिंग क्लास सुरू अाहेत. कॅम्पके १२, स्माऊल अाणि मूव्ह फाॅरवर्ड काही अाॅनलाइन अाणि एज्युकेशनल टेक स्टार्टअप अाहेत, येथे मुलांना काेडिंग शिकवण्यावर लक्ष दिले जाते. जर तुम्हाला असे वाटत असेल की, काेडिंगमुळे मेंदूचा केवळ डावा भाग विकसित हाेताे अाणि कलात्मकता विकसित हाेणार नाही तर कॅम्पके १२ चे अंशुल भागी या शंकेचे समाधान करताना म्हणाले, काेडिंग ही हिंदी, इंग्रजी किंवा फ्रेंचप्रमाणे एक भाषा अाहे. अंशुलच्या मते, जसे अापण अभिव्यक्ती अाणि कवितेसारख्या रचनात्मक स्वरूप अशा दाेन्ही पद्धतीने संवाद साधू शकताे तसेच काेडिंगद्वारे कलात्मकता अाणि अभिव्यक्तीच्या भरपूर संधींची शक्यता अाहे. अायअायटी दिल्लीतून शिक्षण घेतलेले स्माऊलचे सह-संस्थापक शैलेंद्र धाकड म्हणाले की, १२ ते १४ वर्षे शालेय शिक्षण त्या नव्या मुलांना अधिक परफेक्ट बनवते अाणि संगणकीय बेसिक समजून देते, जी मुले तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू इच्छितात अाणि ज्यांना वाटते की शालेय शिक्षण या माध्यमातून व्हायला हवे. मुले जसे क्रेयाॅन्सद्वारे चित्र रेखाटतात, तसेच काेडिंग काही सुंदर अाणि रचनात्मक निर्मितीसाठी प्राेग्रॅमिंगचा वापर करते. अाई-वडीलदेखील या अाॅनलाइन किंवा फिजिकल काेचिंग क्लासेसचे समर्थन करीत अाहेत. पदवी शिक्षणासाेबतच मुलांमधील काैशल्यास पूर्ण वाव मिळाला पाहिजे असे पालकांना वाटते. हे माॅड्युल्स शिकून झाल्यानंतर मुले माेबाइल अॅप्स, छाेटे गेम्स इतकेच नव्हे, तर पालकांच्या व्यवसायासाठी वेबसाइटदेखील बनवू शकतात. अाता माझा मुलगा रंगीबेरंगी वेबसाइट्स अाणि माेबाइल अॅप्स बनवताे हे अभ्यागतांना सांगण्याचे दिवस अाले अाहेत. यापूर्वी मुलगा तबला किंवा पियानाे वाजवताे असे सांगितले जायचे. काेडिंग हे नव्या पिढीचे भवितव्य ठरत असले तरी मुले स्क्रीनसमाेर अधिक वेळ बसून राहिल्यामुळे त्यांच्या डाेळ्यास हानी पाेहाेचण्याची भीती अाहे. म्हणूनच अाई-वडिलांनी अापल्या मुलांचे अायुष्य रंगतदार बनवत असताना संतुलन अाणि देखभालीकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी त्यांना वेगळा काेर्स करावा लागेल.

फंडा असा : सध्या काेडिंग हा साऱ्यांना रंगीबेरंगी विषय वाटताे अाहे. मुलांचे भवितव्य परफेक्ट बनवण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रात काेडिंगचे रंग भरू शकता.

बातम्या आणखी आहेत...