Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | paracetamol dose for child information in marathi

लहान मुलांना पॅरासिटामॉल देण्यापूर्वी हे अवश्य वाचा...

हेल्थ डेस्क | Update - Aug 05, 2018, 12:04 AM IST

पॅरासिटामॉलला सुरक्षित औषधी मानले जाते, परंतु हे मुलांना देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

 • paracetamol dose for child information in marathi

  पॅरासिटामॉलला सुरक्षित औषधी मानले जाते, परंतु हे मुलांना देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. सावधगिरी बाळगली नाही किंवा याचा जास्त डोस दिला तर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.


  पॅरासिटामॉल देताना लक्षात ठेवा या गोष्टी
  - बाळाचे वय 3 महिन्यांपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याला पॅरासिटामॉल देऊ नका.
  - बाळाच्या शरीराचे तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर पॅरासिटामॉल देणे टाळा.
  - तुम्ही बाळाला आधीच दुसरे एखादे औषध देत असाल तर पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका.
  - बाळाला लिव्हरसंबंधी एखादा आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पॅरासिटामॉल द्या.
  - 4-5 तासांच्या आत दोनदा पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका.
  - पॅरासिटामॉल दिल्यानंतरही बाळाची तब्येत चांगली राहिली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  - पॅरासिटामॉल दिल्यानंतर बाळाला उलटी होत असेल तर ते देऊ नका.
  - तुम्ही आजारपणात मुलांना पॅरासिटामॉल देत असाल तर हे 10 mg/kg च्या हिशोबाने द्या.
  - उदाहरण : मुलाचे वजन 10 किलो असेल तर त्याला 100 mg पॅरासिटामॉल द्या.

Trending