Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | parampara-why-is-music-played-at-the-wedding-ceremony

लग्नात सनई चौघडा का ?

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 28, 2011, 04:31 PM IST

लग्न म्हणजे संसाययुद्ध असते. या संसारयुद्धात ढोल संगीताचे वेगळे महत्त्व आहे.

  • parampara-why-is-music-played-at-the-wedding-ceremony

    लग्न समारंभात सनई चौघडा वाजतात. मंगलगीत गायल्या जातात. घरातील सारेजण आनंद उल्हासात असतात. तसे पाहिले तर संगीत आणि आनंद यांचा परस्परसंबंध आहे. संगीत असल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण होऊ शकत नाही. ढोल नगारे आणि सनई ही संगीताची पारंपरिक साधने आहेत. यांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे.
    पूर्वीपासूनच लग्नप्रसंगी महिला मंगलगीत गायच्या. यावेळी ढोल वाजविला जायचा. भगवान शिव आणि सतीचा विवाह असो की राम सीतेचे स्वयंवर, यावेळी महिलांनी एकत्र येऊन मंगलगीत गायल्याचे संदर्भ मिळतात. आपल्याला माहित आहे की भगवान शिवाकडे डमरू होता. तांडव करताना ते वाजवायचे.
    लग्न म्हणजे संसाययुद्ध असते. या संसारयुद्धात ढोल संगीताचे वेगळे महत्त्व आहे. मनात एक उत्साह भरला जातो. या ध्वनी तरंगतून एक जोश आणि साहस निर्माण होतो.

Trending