ऑस्कर 2020 / ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट; ‘जोकर’साठी जोकिन फीनिक्सला बेस्ट अ‍ॅक्टर तर 'जुडी'साठी रिनी जॅलवेगर बेस्ट अ‍ॅक्ट्रेस पुरस्कार

 • दक्षिण कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ साठी बॉन्ग जून हो याने बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार जिंकला 
 • बेस्ट डॉक्यूमेंट्रीचा अवॉर्ड माजी राष्ट्रपती ओबामाच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला ‘अमेरिकन फॅक्ट्री’ ने जिंकला

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2020 01:59:09 PM IST

​​​​​​लॉस एंजेलिस - 92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर) हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. सर्व अवॉर्ड्सची घोषणा झाली आहे. दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला. ‘जोकर’ साठी जोकिन फीनिक्सला बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळाला. तसेच, चित्रपट ‘ज्युडी’ साठी रिनी जॅलवेगर बेस्ट अ‍ॅक्ट्रेस निवडली गेली. दक्षिण कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ साठी बॉन्ग जून हो याने बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार जिंकला.

कोणाला कोणता पुरस्कार मिळाला...

 • बेस्ट पिक्चरः 'पॅरासाइट (Parasite)'
 • बेस्ट अॅक्टरः जोकीन फीनिक्स (Joker)
 • बेस्ट अॅक्ट्रेसः रेनी जेलवेगर (Judy)
 • बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- लॉरा डर्न
 • बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- ब्रॅड पिट (Once Upon A Time In Hollywood)
 • बेस्ट ऑरिजनल स्क्रीनप्ले- बोंग जॉन हो, हां जिन (Parasite)
 • बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले- टायका बायटिटी (Jo Jo Rabbit)
 • बेस्ट अॅनिमेटिड फीचर- टॉय स्टोरी 4 (Toy Story 4)
 • बेस्ट डाक्यूमेंट्री फीचर- अमेरिकन फॅक्टरी
 • बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट- Learning To Skateboard In A Warzone (If You're A Girl)
 • बेस्ट लाइव अॅक्शन शॉर्ट- The Neighbour's Window
 • बेस्ट अॅनिमेटिड शॉर्ट- Hair Love
 • बेस्ट प्रोडक्शन डिझाइन- Once Upon A Time In Hollywood
 • बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन- Little Women

ऑस्कर 2020 चे वैशिष्ठ्य

 • सॅम मेंडिस 20 वर्षानंतर ऑस्करसाठी नॉमिनेट झाले आहे.
 • हॉलिवूडचे लीजेंड मार्टिन स्कोरसेस सर्वात जास्त 9 नॉमिनेशन मिळवणारे लिव्हिंग डिरेक्टर आहेत. मार्टिनला नेटफ्लिक्स स्टूडियोचा चित्रपट ‘द आयरिशमॅन’साठी बेस्ट डायरेक्टर कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केले गेले आहे.
 • बेस्ट अ‍ॅक्ट्रेस आणि गाणे स्टॅन्ड अपसाठी दोन कॅटॅगरीमध्ये नॉमिनेट झालेल्या सिंथिया इरिवो हीदेखील जिंकून नवीन रेकॉर्ड बनवू शकते. जर सिंथिया एकही कॅटॅगरीमध्ये जिंकली तर एमी, ग्रैमी, ऑस्कर आणि टोनी अवॉर्ड जिंकणारी 16 वी सेलेब्रिटी बनेल.
 • ‘लिटिल वुमन’ साठी नॉमिनेट झालेली 25 वर्षीय साओर्स रोनन चार वेळा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस नॉमिनेशन मिळवणारी सर्वात तरुण अ‍ॅक्ट्रेस बनली आहे. यापूर्वी जेनिफर लॉरेंसला हे यश मिळाले होते.
 • यावर्षीही कोणत्याही महिला डायरेक्टरला नॉमिनेशन मिळाले नाही.
 • अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामाच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला ‘अमेरिकन फॅक्टरी’ला बेस्ट डॉक्यूमेंट्रीचा पुरस्कार मिळाला.
 • म्यूझिक कम्पोजर जॉन व्हिलियम्स इतिहासात सर्वात जास्त ऑस्कर नॉमिनेशन (52) मिळवणारे लिव्हिंग कलाकार आहे. जॉनपेक्षा जास्त नॉमिनेशन (59) वॉल्ट डिज्नी ला मिळालेले आहेत.

X