आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parasran Was Undergoing Eye Treatment In Chennai, A Day Before Ayodhya's Result; That Night He Arrived In Special Plane At Delhi!

अयाेध्या निकालाच्या एक दिवसाआधी चेन्नईत डोळ्यांवर उपचार घेत होते परासरन; त्या रात्री विशेष विमानाने दिल्लीत पोहोचले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात रामलल्ला विराजमानची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडणारे ९२ वर्षीय वकील के. परासरन यांचे महत्त्वाचे योगदान होते. निकालाच्या एक दिवसाआधी ते दिल्लीपासून हजारो मैलांवर असलेल्या चेन्नईमध्ये डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी गेले होते. निकाल जाहीर होण्याची माहिती मिळताच रात्री २.३० वाजता ते चेन्नई विमानतळावर पोहोचले आणि विशेष विमानाने सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले.
परासरन यांचे सहकारी वकील श्रीधर पोत्राजू यांनी सांगितले की, अयोध्याप्रकरणी निकालाच्या तारखेचा अंदाज कोणालाही नव्हता. परासरन डोळ्यांच्या उपचारासाठी चेन्नईला गेले होते. १८ नोव्हेंबरच्या रात्री ८.४५ वाजता दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होण्याची सूचना मिळाली. त्यांनी सांगितले, 'मी परासरन यांना माहिती दिली. ते म्हणाले की, मी डॉक्टरांना भेटायचे रद्द करून दिल्लीला परतत आहे. पण विमान मिळाले नाही. आम्ही तुम्हाला निकालाची माहिती देत राहू , असा सल्ला त्यांना दिला. परंतु त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वत: पोहोचून निकाल एकण्याचे ठरवले. रात्री २.३० वाजता त्यांनी फोन करून सांगितले की, ते मुलगा विष्णू परासरनसोबत चेन्नई विमानतळावर पोहोचले. यानंतर त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. विमानाने ५ वाजता चेन्नईवरून उड्डाण केले. परासरन यांच्यासाठी कपडे आणि नाष्टा घेऊन पाेत्राजू सकाळी ८.३० वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले. परासरन यांनी फक्त सदरा बदलला. रस्त्यात पोंगलचा नाष्टा केला आणि ९ वाजता कोर्टात दाखल झाले. निकालानंतर त्यांना आनंद झाला. पोत्राजुंनी सांगितले की, न्यायालयीन कारवाईशी संबंधित २० हजार कागदपत्रे स्कॅन करून डिजिटलाइज केली आहे. ते सार्वजनिक करण्याविषयी हैदराबादच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा सुरू आहे. अयाेध्येवर चित्रपट बनवण्यासाठी काही निर्माता आणि दिग्दर्शक संपर्कात आहेत. परासरन आणि त्यांचे सहकारी या आठवड्यात रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान तत्कालीन सरन्यायाधीश गोगोईंनी परासरन यांना बसून युक्तिवाद करण्याची परवानगी दिली होती. पण श्रीरामांसाठी मी कोर्टाच्या पंरपरेप्रमाणे उभे राहून युक्तिवाद करेन, असे ते म्हणाले होते.बॅकअप टीम ही तयार होती : पाेत्राजूंनी सांगितले की, सर्व टीम या प्रकरणाला काम नाही, तर श्रद्धेच्या दृष्टीने बघत होती. लोकांनी १६-१६ तास काम केले. काही सहकारी आजारीही पडत होते. याचा कामावर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही बॅकअप टीम तयार केली होती.इंटेरिअर डिझायनरकडून बनवून घेतला होता अयोध्येचा रंगीत नकाशा


परासरन यांच्यासोबत १५० पेक्षा जास्त लोकांचे पथक या मुद्द्यावर काम करत होते. पोत्रोजू यांनी सांगितले की, फोटो कॉपी अाणि नकाशा त्यांच्या कार्यालयात तयार झाला. त्यांच्याकडे रंगीत नकाशा नसल्याने कौटुंबिक मित्र आणि इंटेरिअर डिझायनर, आर्किटेक्ट मीतू गोयल यांची मदत घेतली. प्रभू श्रीरामाचे काम सांगत त्यांनी फी घेण्यासही नकार दिला.
 

बातम्या आणखी आहेत...