आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पार्च्ड'च्या डायरेक्टर म्हणाल्या - महिला असल्यामुळे लोकांनी एकत्र काम करण्यास नकार दिला होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. 2015 मध्ये आलेल्या 'पार्च्ड' चित्रपटाच्या डायरेक्टर लीना यादव चित्रपट इंडस्ट्रीमध्ये महिलांसोबत होणा-या भेदभावाविषयी बोलल्या आहेत. एका टॉक शोमध्ये त्यांनी सांगितले की, करिअरमध्ये अशा अनेक संधी आल्या, जेव्हा लोकांनी फक्त महिला असल्यामुळे माझ्यासोबत काम करणे बंद केले होते. 'पार्च्ड' चित्रपट अजय देवगणने प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट जास्त कमाई करु शकला नाही, पण क्रिटिक्सने त्यांची खुप प्रशंसा केली. 'पार्च्ड' मध्ये 2010 मध्ये एशिया पॅसेफिक स्क्रीन अवॉर्डमध्ये बेस्ट स्क्रीन प्लेसाठी नॉमिनेट झाल्या होत्या. 

 

विश्वास ठेवत नव्हते क्लाइंट - लीना 
1. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया दरम्यान आयोजित केलेल्या चर्चेदरम्यान लीना याविषयी बोलल्या होत्या. या चर्चेमध्ये डायरेक्टर गौरी शिंदे आणि मेघना गुलजारही उपस्थित होत्या. 
2. एडिटर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या लीना यादव म्हणाल्या की, अनेक वेळा क्लाइंटला माझ्या क्षमतांवर विश्वास बसत नव्हता आणि ते मला स्वतःला सिध्द कर असे म्हणायचे.
3. लीनाने सांगितले - एक घटना मला लक्षात आहे. तेव्हा आम्ही हायबँड कॅमेरावर काम करत होतो. मला फ्रीलान्स एडिटर म्हणून हायर केले गेले होते. त्यांनी मला विचारले की, तु एडिटर आहेस? मी होकार दिला. त्यांनी त्या ठिकाणाची सर्व वायरिंग काढली आणि मला म्हणाले की, तुला सर्व काही माहित असेल, या ठिकाणची सर्व वायरिंगसुध्दा?
4. लीना म्हणाल्या - मला सर्व वायरिंगविषयी माहिती होती. मी सर्व वायरिंग पुन्हा लावली. यानंतर मी त्या क्लाइंटला म्हणाले - मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही आणि मी बाहेर निघून गेले. 

 

बेन किंग्स्लेने केली होती लीनाची स्तुती 
5. 'तीन पत्ती'मध्ये कामाचा अनुभव सांगताना लीना म्हणाल्या होत्या की, बेन किंग्स्ले माझ्याविषयी म्हणाला होता की, मी पात्राविषयी एवढे जाणते की, आम्ही संपुर्ण चित्रपटानंतरही त्या पात्राला ओळखू शकत नाही. यामुळे मला वाटते की, गप्प बसून लीनाला ऐकायला हवे.
6. लीना म्हणाल्या - 2005 मधील 'शब्द' चित्रपटाविषयी लीना म्हणाल्या - हा चित्रपट स्टार्ससाठी होता असे मला वाटत नाही. मला वाटत होते की, हा एकदम स्वतंत्र चित्रपट होता, पण माझे प्रोड्यूसर प्रितिश नंदीला वाटत होते की, यामध्ये मी स्टार्स घ्यावे. 
7. "आम्ही अभिनेत्यांना या चित्रपटाची कथा ऐकवली आणि ते तयार झाले. यामुळे आम्ही सर्व चकित झालो होतो. चित्रपटादरम्यान मला जाणवले की, अॅक्टर हा चित्रपट करण्यासाठी तयार नव्हते आणि ते टेंशनमध्ये होते."

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...