आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आर्थिक परिस्थिती नात्यांचे अंतरंग बदलून टाकते. उद्योगपतींच्या घराण्यातील विवाहामुळे शेअर बाजारही प्रभावित होतो. अमिताभ बच्चन आणि नूतनच्या ‘सौदागर’मध्ये खजुराच्या झाडाच्या रसापासून गुळ बनवण्याची पार्श्वभूमी होती. नायक आपल्याहून वयाने मोठ्या गुणवान महिलेशी लग्न करतो. ती गुळ बनवण्यात निपुण असते. खरे तर नायकाचे एका तरुण मुलीवर प्रेम असते. मात्र अार्थिक कारणांमुळे तो त्या महिलेशी लग्न करतो. त्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नाते बनवले असते. ५०० रुपयांची बचत होताच तो पत्नीला घटस्फोट देतो. त्याच पैशातून आवडत्या तरुणीशी लग्न करतो. त्याची दुसरी बायको तरुण असते. मात्र तिला गुळ बनवता येत नाही. नायकाचा व्यवसाय ठप्प होतो. दुसरीकडे त्याच्या घटस्फोटित पत्नीचा विवाह ज्याच्याशी होतो त्याला आधीच तीन मुले असतात. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांच्या देखभालीसाठी तो दुसरे लग्न करतो. तो अतिशय साधा आणि सरळ माणूस असताे. दरम्यान कंगाल झालेला नायक आपल्या घटस्फोटित पत्नीकडे जातो. आपल्या पत्नीला गुळ बनवण्यास शिकवण्याची विनंती करतो. ती मदत करते. राजिंदर सिंह बेदीची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’मध्ये विधवा नायिकेला आपल्या दिराबरोबर लग्न करावे लागते. लग्नाच्या वेळी हा दीर एक ७ वर्षाचा बालक असताे. त्याच्या वहिनीने त्याला वाढवलेले असते. गावचे पंच निर्णय घेतात की, त्याच्या मिळकतीत दोन कुटुंबाचा गाडा चालू शकणार नाही. शेवटी दीर-वहिनीचे लग्न होते. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बाली यांनी या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला. काही भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर त्या देवीच्या रोगाने आजारी पडल्या. लहानपणी लस न टोचल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीणच होते. त्यांच्या मृत्यूनंतर शम्मी यांनी त्या चित्रपटाची कॉपी जाळून टाकली. त्यांना वाटे आऊटडोअर शूटिंगमुळे हा रोग झाला. ताजी बातमी ही की, किशोर कुमारच्या ‘बेगुनाह’चे काही भाग आर्काइव्हला मिळाले आहेत. हा चित्रपट डॅनी अभिनीत नॉक ऑन वूडवर आधारित होता. अमेरिकन निर्मात्याने मोठ्या दंडासाठी आय. एस.जोहर यांना नोटीस धाडली. आज किशोर कुमारचे पुत्र अमित यांना कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. कोर्टाच्या आदेशानंतरच चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. आपल्या देशात इतिहासाचा अभ्यास तोकडा आहे. पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष होतेय. अनेक किल्ले, जुने ग्रंथ नष्ट झाले आहेत. विश्राम बेडेकर, पृथ्वीराज आणि सुरैया अभिनीत ‘रुस्तम सोहराब’च्या निर्मितीच्या वेळची गोष्ट. अमेरिकेत शिकणारा त्यांचा मुलगा स्टुडिओत येतो. त्याने पित्याला विचारले, आपण कोणत्या काळातील चित्रपट बनवत आहोत? काही पात्रांनी मोगल कालीन पोषाख केला होता. बेडेकरांनी उत्तर दिले की, हा चित्रपट त्यांच्या वाईट काळात बनत आहे. आर्थिक समस्यांमुळे चित्रपट निर्मितीत अनेक अडचणी येत आहेत. बगिच्याचा सेट असेल तर कागदी फुले लावावी लागतात. चित्रपट यशस्वी झाल्यास या कागदाच्या फुलांचाही सुगंध येईल. स्वित्झर्लंडच्या रम्य निसर्गात बनलेला हा चित्रपट अपयशी झाल्यास एल्प्सच्या बर्फाचे वितळणे आलेच. मध्यम वर्गाने आर्थिक संकटसमयी आपली सरळ जीवनशैली कायम ठेवली. गेल्या काही दशकांपासून बाजारातील काही अनावश्यक झगमगाट आपल्याला भुरळ घालत आहे. खरेतर अशी दिशाभूल होण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.