आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक मंत्री डॉ. विजयलक्ष्मी साधौ यांनी वहिदा रहमान यांचे वय झाल्याने त्यांना किशोर कुमार पुरस्कार त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन दिला. युवकांना वगळण्यात आल्याने विरोध केला जात आहे, जणू वय होणे आणि व्याधीग्रस्त असणे अपराधच आहे. ‘इट्स नो कंट्री फॉर ओल्डमॅन’ असे एका अमेरिकन चित्रपटाचे नाव होते. इथे काहीजण नागरिकांना बिगर भारतीय बनविण्यास तयार आहेत, ज्यांना सरकारी संरक्षण आहे. यातच आयफा पुरस्कारांचे इंदुरमधील आयोजन यावरही प्रश्नचिन्ह लावले गेले अाहे. तथापि, याकडे दुर्लक्ष केले जात असून बाजारात आर्थिक मंदी असताना या आयोजनातून काही प्रमाणात बाहेर येता येईल. आसपासच्या शहरातून लोक येथे आल्याने यातून पर्यटनालाही लाभ मिळेल. गुरुदत्त यांच्या हैदराबादच्या वितरकांनी त्यांची वहिदा रहमानसोबत भेट घालून दिली होती. वहीदाजींनी चरित्र भूमिका केल्या आहेत. गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’मध्येही त्यांची छोटी भूमिका होती. ज्यातील ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना..’ हे गाणे खूप गाजले. ‘प्यासा’साठी त्यांची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती, त्यांना गुरुदत्त यांच्या टीमने नाकारले होते. गुरुदत्तने कोलकाता येथे जाऊन दुसरी स्क्रीन टेस्ट घेतली, जी सर्वांना भावली. ‘प्यासा’मधील त्यांचे गुलाबो हे पात्र खूप गाजले. ‘कागज के फूल’ नंतर गुरुदत्त यांचा ‘चौदहवीं का चांद’ही अयशस्वी ठरला. त्यांच्या पुढील ‘साहब बीवी और गुलाम’ मध्ये मीनाकुमारीची मुख्य भूमिका होती, तर वहिदाजी यांची चरित्र भूमिका होती. निर्माते विजय आनंद यांच्या ‘काला बाजार’मध्येही त्यांनी काम केले, पण ‘गाइड’मधील त्यांचा अभिनय सर्वश्रेष्ठ मानला जाताे. एका मुलाखतीत त्यांनी विजय आनंद हेच त्यांचे निर्माते असे सांगितले. त्यांनी वयोमान झाल्यावरही अनेक चरित्र भूमिका केल्या. यशराज चोप्रा यांच्या ‘लम्हे’मध्ये त्यांनी दाईजा हे पात्र साकारले. ‘रंग दे बसंती’ आणि ‘दिल्ली ६’ मध्येही त्यांचे योगदान होते. गुरुदत्त यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्यावर संशय घेतला गेला, पण गुरुदत्त हे त्यांच्या पत्नी गीता दत्त यांच्या व्यसनाधीनतेमुळे त्रस्त होते. त्यांच्या आत्महत्येचे संकेत ‘कागज के फूल’मधील ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।’ मधून दिसतात. जेथे यश आणि संपत्ती काहीही करू शकत नाही. आध्यात्मिकतेच्या स्पर्शातून भौतिकवादाच्या दंशापासून वाचता येते. वहीदाजींनी शैलेंद्र यांच्या ‘तिसरी कसम’साठी अल्प मानधन घेतले. ‘नौटंकी’तील हिराबाईचे पात्र त्यांच्यासाठी आव्हान होते, परंतु ‘गाइड’च्या रोझीसारखे साहसी पात्र पुन्हा होणे नाही. रोजी आपल्या नृत्यकलेतून स्वत:ची ओळख निर्माण करू पाहते, ज्यात आई व पतीच्या सहकार्याविना व त्यांचा मार खात ती हे साध्य करते. राजू गाइड तिच्या जीवनात अचानक येतो. रोझी यशस्वी होऊनही सामान्यच राहते, परंतु तिच्या यशाची राजूला झिंग चढते. रोझीच्या पात्राला शैलेंद्र यांनी ‘तोडकर बंधन बांधी पायल, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’। असे शब्दबद्ध केले. चित्रपट उद्योगासारख्या व्यवसायात असूनही वहिदाजी आजही चारित्र्यसंपन्न असून आजवर त्यांनी कधीच आपले देह प्रदर्शन केले नाही. त्यांचा ‘खामोशी’मधील अभिनय ‘गाइड’च्या रोझीप्रमाणे संस्मरणीय आहे. ‘खामोशी’ मध्ये त्यांनी नर्सची भूमिका साकारली असून ती यामध्ये मनोरुग्णांची सेवा करते आणि ही सेवा करता-करता तिचेच मानसिक संतुलन बिघडते. त्या आजही आपला बडेजाव दर्शवत नाहीत. त्या गरजेपुरतेच बोलतात. त्यांचे आयुष्य जणू दोरीवर चालण्यासारखे असून त्यांनी मार्गही सोडला नाही व पापण्याही लवू दिल्या नाहीत. मध्य प्रदेशच्या मंत्री साधौ यांनी त्यांना घरी जाऊन पुरस्कार देणे हे अभिनंदनीय आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.