आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग बरसे... पान खाए गाेरी का यार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू श्रीराम अयाेध्येस परतले आणि दीपाेत्सव सुरू झाला. बहुधा हाेळीचा उत्सव द्वापारयुगात सुरू झाला असावा. मदर इंडिया, शाेले, नवरंग आणि टाॅयलेट-एक प्रेमकथासारख्या चित्रपटांतील हाेळीचा प्रसंग नाट्यपूर्ण आणि निर्णायक टप्प्याचे दर्शन घडवते. युराेपातही हाेळीप्रमाणेच एका उत्सवात रंगाच्या बदल्यात टोमॅटो फेकले जातात. फरहान अख्तर अभिनीत एका चित्रपटात हा प्रसंग चित्रित करण्यात आला हाेता. बरसानाच्या हाेळीमध्ये महिला पुरुषांना लाठीने बुकलून काढतात. या उत्सवात महिला-पुरुष आपापल्या भूमिका स्वच्छंदीपणे बजावतात. वर्षभर पुरुषांकडून छळ सहन करणाऱ्या महिलांना वर्षातून हा एक दिवस मनातली भडास काढण्यासाठी मिळताे. वास्तवात अशी संधी मिळणे तसे दुरापास्त असते. विद्या बालन अभिनीत ‘कहानी’मधील क्लायमॅक्स दुर्गा उत्सवाच्या प्रसंगी घेतला गेला आहे. नायिका दहशतखाेराची हत्या करते आणि महिलांच्या मेळ्यात सामील हाेते. साऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर गुलाल उधळलेला असताे. त्यामुळे मारेकरी महिलेस पाेलिस शाेधू शकत नाहीत. राजीव कपूरच्या ‘प्रेमग्रंथ’मध्ये रावणदहनाचे दृश्य चित्रित करण्यात आले. रावणदहनाचे दृश्य शशी कपूरच्या ‘अजूबा’मध्ये देखील हाेते. शशी कपूरच्या उत्सव या चित्रपटाचा आरंभ वसंताेत्सवापासून हाेताे. राज कपूर फिल्म इंडस्ट्रीत माेठ्या थाटाने उत्सव साजरा करीत असत. सितारादेवी नृत्य करीत असत. चित्रपट उद्याेगातील हाेळीची मुहूर्तमेढ राेवणाऱ्या राज कपूर यांच्या काेणत्याही चित्रपटात हाेळीचे चित्रण दिसत नाही. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत असताना अमिताभ बच्चन यांनी आरके स्टुडिआेमध्ये हाेळीच्या पार्श्वभूमीवर ‘रंग बरसे’ हे गीत गायिले हाेते. त्यानंतर काही वर्षांतच यश चाेप्रा यांच्या ‘सिलसिला’मध्ये या गीताचा समावेश करण्यात आला हाेता. या वेळच्या दृश्यात आपल्या पतीसमाेर पत्नी तिच्या प्रियकराशी फ्लर्ट करीत असल्याचे पाहायला मिळते. संजीवकुमार हा प्रसंग तटस्थपणे पाहणाऱ्या पतीच्या भूमिकेत तर जया बच्चन अशा पत्नीची भूमिका वठवते, जिचा पती अन्य व्यक्तीच्या पत्नीसाेबत पाळावयाच्या साऱ्या मर्यादांचे उल्लंघन करत असताे. अमिताभ, जया आणि संजीवकुमार, रेखा यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली हाेती. कदाचित हाेळीच्या दृश्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसावा. यश चाेप्रा यांनी ‘केप फिअर’वर आधारित ‘डर’ या चित्रपटात हाेळीचा प्रसंग चित्रित केला. या चित्रपटातील खलनायक एकतर्फी प्रेम करीत असलेल्या महिलेच्या चेहऱ्यास रंग लावताे. हा चित्रपट एकतर्फी प्रेमावर आधारित हाेता. राकेश राेशन अभिनीत चित्रपटात हाेळीच्या रंगामुळे एक पात्र आपले डाेळे गमावते. त्या वेळी अन्य मृत व्यक्तीच्या डाेळ्यांचे त्यावर प्रत्याराेपण केले जाते. एखाद्या भल्या माणसाचे डाेळे प्रत्याराेपित केले तर त्या व्यक्तीचा दृष्टिकाेन बदलताे, असेही या चित्रपटातून दर्शवण्यात आले हाेते. डाेळ्यांसाेबतच सकारात्मकता येते, हा त्यातील महत्त्वाचा भाग हाेता. या वर्षी काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव विलक्षण गतीने हाेत असल्यामुळे हाेळीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा हाेणार नाही. हाेळी-धुळवडीचा दिवस म्हणजे भांग, अफू, मद्य आणि गांजाच्या प्रभावाचा दिवस मानण्याची जणू प्रथा पडली आहे. वस्तुत: सारे मादक पदार्थ कॅटेलेटिक एजंटप्रमाणे काम करतात, आणि एखाद्या नशेतच माणसातील सच्चेपण दिसून येते. यासंदर्भात रवींद्र जैन यांच्या या काव्यपंक्तींची आठवण येते- ‘गुण अवगुण का डर भय कैसा, जाहिर हो भीतर तू है जैसा।’ रवींद्र जैन यांनी हे गीत राज कपूर यांच्या एका चित्रपटासाठी लिहिले हाेते, त्या चित्रपटाची निर्मिती कधी झालीच नाही.

बातम्या आणखी आहेत...