Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | parents committed suicide after daughter death in Karad

मुलीच्या आत्महत्येनंतर आई, वडिलांनीही घेतला गळफास ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2019, 11:17 AM IST

  • parents committed suicide after daughter death  in Karad

    कराड - विवाहित मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्यानंतर आई- वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथे शुक्रवारी घडली. शिवाजी आनंदा मोहिते (५९), बेबी शिवाजी मोहिते (४३) आणि वृषाली विकास भोईटे (२३) अशी मृतांची नावे आहेत.


    मृत मोहिते हे मूळ उंब्रज येथील रहिवासी होते. एसटीत नाेकरीला असल्याने ते सैदापूर येथे राहत होते. त्यांना १ मुलगा व मुलगी होती. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. मुलगी वृषालीचा २ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, ती लग्नापासून माहेरीच राहत होती. आई-वडील बाहेर गेले असता तिने घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दोघेही परतल्यानंतर दरवाजा वाजवून पाहिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला असता मुलीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पुण्यात असलेल्या मुलाला फोन करून सांगितले. मुलाने गावातील मित्रांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी शिवाजी यांच्यासह त्यांची पत्नी बेबी यांनी गळफास घेतल्याचे मित्रांना दिसले. याबाबत माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Trending