आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरत - येथील लोडसर गावात राहणाऱ्या एका पती-पत्नीने आपल्या मुलीला पळवून नेणाऱ्याच्या धमक्यांना घाबरून आत्महत्या केली. आरोपींनी 13 ऑगस्ट रोजी फोन करून मुलीचा शोध ताबडतोब बंद करा अन्यथा अख्ख्या कुटुंबाला ठार मारू असे धमकावले होते. याच भीतीने पती-पत्नीने आपल्याच घरात गळफास घेतला. आता या कुटुंबात फक्त 1 मुलगा उरला आहे. गेल्या काही दिवसांपासून बहिण बेपत्ता आहे. आई-वडिलांनीही आत्महत्या केली. आता कोणासोबत राहू असा प्रश्न अकरावीत शिकणाऱ्या त्या मुलाला पडला आहे.
मुलाने सांगितले...
14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मुलगा गौतम घरी आला होता. गेट कुणीच उघडले नसल्याने त्याने आपल्या शेजारीच राहणाऱ्या एका काकूला ही गोष्ट सांगितली. त्यांनी मुलाच्या वडिलांना (हरिराम) फोन केला. परंतु, त्यांनीही काही प्रतिसाद दिला नाही. यानंतर ते घरी पोहोचले. त्या ठिकाणी हरिरामचा भाऊ आणि इतर काही लोक आधीच उपस्थित होते. त्या सर्वांनी मिळून कसे-बसे दार उघडले. तेव्हा हरिराम आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह पंख्याला लटकला होता. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
असे आहे प्रकरण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय हरिराम गेल्या 20 वर्षांपासून सुरतच्या लोडसर गावात राहत होते. मुलगी 17 वर्षांची आहे. तसेच 10 वी नंतर तिचे शिक्षण बंद झाले. मुलगा सध्या 11 वीला आहे. 15 जुलै रोजी त्यांची 17 वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली. सुरत पोलिसांनी या प्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा नोंदवली. यानंतर त्याच गावात राहणाऱ्या दीपक शर्मा आणि त्याच्या एका मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिन्यानंतरही मुलीचा पत्ता लागला नाही. यानंतर हरीराम पोलिसांना दिल्लीत घेऊन गेला. तेव्हापासूनच त्याला धमक्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली. 13 ऑगस्टला रविवारी रात्री 10.30 वाजता त्याला एक कॉल आला होता. त्यावर तुझी मुलगी आमच्याकडे आहे. तिचा शोध घेणे बंद कर अन्यथा अख्ख्या कुटुंबाला ठार करू अशा धमक्या समोरून मिळाल्या. या धमकीच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी आत्महत्या केली.
दिल्लीत आहे आरोपी
आरोपी तरुणाने दिल्लीतील एका एटीएमवरून रक्कम काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांना सोबत घेऊन हरिराम दिल्लीत गेला होता. परंतु, गेल्या 15 दिवसांपासून त्याची नवीन माहिती समोर आली नाही. यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची लोकेशन ट्रेस केली. तेव्हा विविध राज्यांचे पत्ते समोर आले. यानंतर आरोपीने आपले मोबाईल देखील बंद केले. यानंतरच त्याने मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.