आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्यूनंतरही तिघांना जीवनदान देऊन गेली 14 वर्षीय अंजली, दोन किडनी आणि लिव्हरचे प्रत्यारोपण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - येथे अपघातात मृत्यू झालेल्या एका 14 वर्षीय तरुणी अंजलीने तीन लोकांना जीवदान दिले आहे. अपघातानंतर डॉक्टरांनी अंजली ब्रेन डेड असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी मुलीचे अवयव दान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांनी दोन किडनी आणि लिव्हर दान केले. रविवारी ग्रीन कॉरिडोर तयार करत तीन रुग्णांवर याचे प्रत्यारोपण करण्यात आले. 

 

अंजली तलरेजा ही हरदा येथे एका अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिच्या नातेवाईकांनी दिला इंदूरच्या शॅल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर शॅल्बी हॉस्पिटलपासून दोन ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आले. पहिले लिव्हर सीएचएल हॉस्पिटलला नेण्यासाठी आणि दुसरा किडनी चोइथराम हॉस्पिटलला नेण्यासाठी. एक किडनी शॅल्बी हॉस्पिटलमध्येच प्रत्यारोपित करण्यात आली. हरदा येथील एका रुग्णालाच ती किडनी प्रत्यारोपित केली. 


हार्टही करायचे होते दान पण ते उपयोगी नव्हते 
डॉक्टरांनी सांगितले की, हार्टचेही प्रत्यारोपण करायचे होते, पण ते उपयोगी नव्हते त्यामुळे शक्य झाले नाही. पण तरीही किडणी आणि लिव्हरच्या प्रत्यारोपणामुळे अंजलीने मृत्यूनंतरही 3 जणांना जीवदान दिले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...