आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांना चष्मा असेल तर मुलांमध्ये दृष्टिदाेष असेलच असे नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे असे मानले जाते की, आई-वडिलांची दृष्टी क्षीण असेल तर त्यांच्या मुलांचीही दृष्टी क्षीण असू शकते किंवा हाेऊ शकते. पालकांना चष्मा आहे म्हणजे मुलांनाही ताे लागणारच. परंतु वस्तुस्थिती अशी की, याचा संबंध माेठ्या प्रमाणावर आहार, जीवनशैली आणि अन्य सवयींशी निगडित आहे. 


नेत्र विशेषज्ञ डाॅ. प्रशांत चाैधरी (आकाश हेल्थ केअर हाॅस्पिटल, द्वारका, नवी दिल्ली) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पालकांची दृष्टी क्षीण असण्याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या मुलांचीही दृष्टी क्षीण हाेऊ शकेल. मात्र ग्लुकाेमा किंवा मायाेपिया (दूरच्या अंतरावरील पाहण्यासाठी चष्मा लागणे) आनुवंशिक असू शकते. २०० पेक्षाही अधिक अशा जीन्सची आेळख पटली आहे, जे 'मायाेपिया'चे कारक आहेत. आई-वडिलांपैकी कुणा एकाची दृष्टी क्षीण असेल तर मुलांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता अधिक बळावते. तैवानमध्ये ८४% शालेय मुलांना चष्म्याची गरज भासते. तथापि, भारतात अशी केवळ ५% मुले आहेत. 


काही बाबतीत असेही घडते की, आई-वडिलांची दृष्टी ठीक असते, परंतु मुलांना चष्मा लागताे. ग्रामीण भागातील (२.८%) मुलांच्या तुलनेत शहरातील (६.९%) मुलांची दृष्टी कमजाेर असल्याचे आढळले आहे. व्हिडिआे गेम, माेबाइल, सततचे वाचन आणि बऱ्याच प्रमाणात शहरी जीवनशैली त्यास अधिक जबाबदार ठरते. जर आई-वडील नियमितपणे मुलांच्या डाेळ्यांची तपासणी करीत असतील तर दृष्टिदाेषाच्या समस्येपासून त्यांचा बचाव हाेऊ शकताे. 

बातम्या आणखी आहेत...