आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUBG गेम खेळण्यापासून आई-वडिलांनी रोखले, 17 वर्षीय मुलाने गळफास घेत केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जींद(हरियाणा)- शहरातील शिवपूरी कॉलोनीत एका ए.एस.आयच्या 17 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी सांगिल्यानुसार मुलाला मागील एक वर्षापासून पबजी मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन लागले होते, त्या गेममुळेच त्याने आत्महत्या केली आहे. 

 

पोलिसांनी सांगितले की, शिवपूरी कॉलोनीत राहणाऱ्या ए.एस.आय. पदावर तैनात असलेल्या सत्यवान यांचा 17 वर्षीय मुलगा तरसेम दहावीची परीक्षा दिल्यापासून घरातच बसत असे. तो मागील एक वर्षापासून आपला सगळा वेळ मोबाईलवर घालवत होता. एका महिन्यांपूर्वीच कुटुंबीयांना समजले की, तो पबजी गेम खेळत होता.


कुटुंबीयांनी त्याला अनेकवेळा मोबाईलवर गेम खेलण्यापासून रोखले, पण तो ऐकत नव्हता. तरसेम रात्रभर गेम खेलत असे, शनिवारी रात्री 9 वाजता तरसेम जेवण करून आपल्या रूममध्ये गेला. घरच्यांना वाटले की, तो झोपला असेल. थोड्या वेळाने त्याच्या आईने आत पाहीले असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालायात दाखल केले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


रविवारी पोस्टमॉर्टम झाल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. कुटुंबीयांनी सांगितले की, त्याला मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखले होते, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. सध्या याप्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.