आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या निधनानंतर आईवडिलांची नजर अचानक तिच्या खोलीतील आरशावर पडली, आणि...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकाः 12 वर्षीय एथिनाला तिच्या वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वीच अचानक तीव्र डोकेदुखी होऊ लागली. तिच्या डोक्याला सूजदेखील आली. तिचे आईवडील तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता, जे सत्य त्यांना समजले, ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एथिनाला बोन कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. आपल्या 13 व्या वाढदिवसाआधी आजाराबद्दल कळल्यानंतर एथिना कोलमडून गेली होती. उपचारांनंतर एथिना बरी होईल अशी आशा तिच्या आईवडिलांना होती, पण दुर्दैवाने तिचे उपचारादरम्यान 13 व्या वाढदिवशीच तिचे निधन झाले. एथिनाच्या निधनानंतर तिच्या आईवडिलांना तिच्या खोलीत एक पत्र मिळाले.

 

एथिनाच्या खोलीची साफसफाई करताना असताना पालकांना मिळाले पत्र...

- एथिनाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. काही दिवसांनी तिचे आईवडील तिच्या खोलीची साफसफाई करत असताना त्यांची नजर बेडरुममध्ये लावलेल्या आरशाच्या मागे पडते.


- आरशामागे एथिनाने लिहिलेले एक मोठे पत्र होते. एथिनाने आयुष्यात तिला आलेले अनुभव बेडरुममधील आरशाच्या मागे तिने लिहून ठेवले होते. 300 हून अधिक शब्दांचे हे पत्र होते.


- एथिनाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, तिने तिच्या पत्रात सकारात्मक संदेश दिला होता. एथिना अतिशय आनंदी आणि हसतमुख मुलगी होती. आनंदी राहण्यासाठी तिला एखाद्या कारणाची गरज नसायची.


एथिनाने पत्रात लिहिले होते... 
एथिनाला वयाच्या 12 व्या वर्षी कॅन्सर झाला होता. या आजारामुळे तिला तिचे केस गमवावे लागले होते, ती अतिशय अशक्त झाली होती. पण आयुष्याकडे ती सकारात्मक दृष्टीने बघत होती. तिने मार्कर पेनाने आरशामागे जो संदेश लिहिला होता, त्यातून आयुष्य जगण्याची सोपी पद्धत तिने सांगितली होती. एथिनाने लिहिले होते, ''आनंद कसा मिळवावा, हे स्वतःवर अवलंबून असतं. आयुष्याचे लक्ष्य फक्त आनंद मिळवून त्याचा अंत होणे हा नाही. आयुष्यातील प्रत्येक दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आयुष्य तेव्हाच वाईट होतं, जेव्हा तुम्ही स्वतः ते वाईट बनवता.'' एथिनाने तिच्या कुटुंबीयांविषयी लिहिले होते, "मला ठाऊक आहे की, एखाद्याच्या जाण्याने किती दुःख होतं. मीही लवकरच जाणार आहे. प्रेम नशीबाने मिळत असतं. आयुष्य कधी कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, काहीच संपत नसतं, फक्त लोक बदलत असतात."

 

पालकांनी सोशल मीडियावर शेअर केले पत्र... 
- एथिनाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बघून तिचे आईवडील अतिशय भावूक झाले होते. एथिनाचे वडील सांगतात, 'तिचा प्रत्येक शब्द आम्हाला दुःख सहन करण्याची ताकद देत होते. ती जाता-जाता आम्हाला आयुष्य जगण्याची पद्धत शिकवून गेली.'' एथिनाच्या वडिलांनी तिचे हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...