आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांनीच पाच वर्षांच्या मुलास लावले होते दारूचे व्यसन; नंतर नकार दिल्यावर तोडले हात-पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपूर - उत्तर प्रदेशातील मथुरेत राहणाऱ्या एका आई आणि वडिलांनी पाच वर्षांच्या मुलास दारूचे व्यसन लावले, गुटखा खाण्यास शिकवले. मुलांना पुढे नकार देताच त्याचे हात-पाय तोडून त्याला राजस्थानातील भरतपूरच्या टोल प्लाझाजवळ फेकून दिले. शुक्रवारी शिशुगृहात जाऊन आजी-आजोबांनी त्याची ओळख पटवली. तेव्हा या सर्व गोष्टीचा उलगडा झाला. मुलाचे नाव गोलू आहे. तो मथुरेजवळील गुडवारा गावाचा रहिवासी आहे. गोलूचे आजोबा राजाराम व आजी फुलवती यांनी सांगितले, गोलूचे वडील प्रकाश दारूडा आहे. त्याने पहिल्या बायकोला सोडलेले आहे. ती आता आमच्याजवळ राहते. १० जून रोजी आम्ही नातवाची बाजू घेतली तर त्याच्या आईवडिलांनी त्याला बेदम मारहाण केली व सोबत घेऊन गेले. तेव्हापासून ते दोघेही गायब झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी गोलूची माहिती मिळाली. बालकल्याण समितीच्या सदस्या प्रज्ञा मिश्रा यांनी सांगितले, गोलूने आईवडिलांसाेबत जाण्यास नकार दिला. तो आजोबासोबत राहणार आहे. पोलिस त्याच्या आई-वडिलाचा हरियाणासह अनेक राज्यांत  शोध घेत आहेत.