आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा नेता व्हावा यासाठी मुलाचे नाव ठेवले Google, आता जगातील सर्वात शक्तीशाली नावाचा मिळाला पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लाइफस्टाइल डेस्क - इंडोनेशियातील एका मुलाच्या नावाला 'World strongest Name' अर्थात जगातील सर्वांत ताकदवर नाव असण्याचा पुरस्कार मिळाला आहे. येथील दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव चक्क गुगल ठेवले. आमचा मुगला मोठा होऊन नेता बनेल असे पालकांचे म्हणणे आहे. पालक मुलाच्या नामकरणानंतर त्याला गुगल नावाने आवाज देण्यास घाबरायचे. पण लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रीया मिळाल्यापासून त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर गर्व होत आहे. 


मुलाचे नाव वेगळे असावे - वडिलांची इच्छा
एंडी सुपुत्रा यांच्या मुलाचा 8 महिन्यांपूर्वी जन्म झाला होता. मुलाचे नाव एकदम वेगळे असावे अशी वडिलांची एंडीची इच्छा होती. यासाठी त्यांनी अनेक नावांचा विचार केला, यासाठी कुराणाची देखील मदत घेतली. पण त्यातील एकही नाव त्यांच्या पसंतील पडले नाही. अखेर आपल्या मुलाचे तांत्रिक नावावर ठेवण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी विंडोज, आयओएस, आयफोन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारखे नावाचा विचार केल्यानंतर अखरे त्यांनी आपल्या मुलाचे नाव गुगल ठेवले. त्यांचे म्हणणे आहे की, आजच्या काळात हा शब्द सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधित वापरात येणारे सर्च इंजिन आहे. 

 

नावासमोर आडनाव जोडले नाही
एंडीने आपल्या मुलाच्या नावापुढे आडनाव जोडले नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गुगलसोबत एखादा शब्द जोडून मी त्याला कमकुवत करणार नाही. माझी अशी इच्छा आहे की, माझा मुलाने गुगलप्रमाणेच सर्वांच मदत करावी. आता लोक मला गुगलाचा बाप म्हणतील.


नामकरणानंतर लोकांनी उडवली होती खिल्ली
गुगलची आई एलाच्या मते, मुलाचे नामकरण केल्यानंतर लोकांनी खिल्ली उडवली होती. आता दुसऱ्या मुलाचे व्हॉट्सअप ठेवावे असे लोकांचे म्हणणे होते. लोकांनी त्या शब्दाचा अर्थ न समजताच त्यावर चेष्टा करत होते. पण आम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आमच्या निर्णयावर ठाम राहिलो.