Home | International | Other Country | parents physically abused thier daughter for years

Shocking: पोटच्या मुलीवर बापानेच वर्षानुवर्षे केला बलात्कार, आईने अब्रू वाचण्याऐवजी केले घटनेचे फोटोशूट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 04:57 PM IST

ही घटना युनायडेट किंगडमच्या स्वान्जी येथील आहे. येथे एका मुलीला तिच्या आईवडिलांनीच कोंडून ठेवले होते.

  • parents physically abused thier daughter for years

    नवी दिल्लीः आईवडिलांना आपण देवाचा दर्जा देतो. आईवडीलच जगाशी त्यांच्या मुलांची ओळख करुन देत असतात. पण जर याच आईवडिलांनी आपल्या मुलीवर हैवानासारखा अत्याचार केला, तर मग... अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना युनायडेट किंगडमच्या स्वान्जी येथील आहे. येथे एका मुलीला तिच्या आईवडिलांनीच कोंडून ठेवले होते. इतकेच नाही तर वडिलांनीच तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या आईने या घटनेचे फोटोशूट केले. एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, आईवडिलांनी केलेल्या या दुष्कर्मामुळे या मुलीची मानसिक अवस्था बिघडली असून ती बरी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे.


    रिपोर्टनुसार, या मुलीला तिच्या आईवडिलांनी कधीच शाळेत पाठवले नाही. तिची कुणाशी मैत्रीसुद्धा होऊ दिली नाही. इतकेच नाही तर तिला कधीच घराबाहेर पडू दिले नाही. या मुलीवर तिचे वडीलच सतत अत्याचार करत राहिले. या मुलीचे घर वेल्सच्या एका शांत परिसरात आहे. घर बाहेरुन अतिशय साधारण दिसते.


    हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांना तिच्या आईच्या मोबाइलमधून 76 फोटोज मिळाले आहे. यामध्ये तिचे वडील मुलीवर बलात्कार करताना दिसत असून आई मुलीचे शारीरिक शोषण करताना दिसतेय. या प्रकरणाची सुनावणी स्वान्जी क्राउन कोर्टात सुरु होती. कोर्टाने याप्रकरणी मुलीच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असून त्यामध्ये 12 वर्षांची शिक्षा भोगणे बंधनकारक आहे. तर आरोपी आईवर लैंगिक शोषणाचे 11 गुन्हे निश्चित झाले आहे. कोर्टाने आरोपी आईला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Trending