आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 दिवसांच्या बाळाचा खतना करण्यासाठी रूग्णालयात गेले आई-वडील, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाले मुलाचे वाईट हाल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरूवनंतपुरम- केरळमधून 23 दिवसांच्या बाळाच्या खतन्याचे प्रकरण समोर आले आहे. खतना करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा प्रायव्हेट पार्ट गंभीर जखमी झाला. त्यानंतर बाळाच्या उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांना खुप पैसा खर्च करावा लागला, नंतर त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगात मदत माहितली आहे. त्यानंतर आयोगाच्या तपासात कळाले की, ज्या रूग्णालयात बाळावर सर्जरी झाली त्यात खुप कमी सुविधा होत्या त्यामुळे आता आयोगने राज्य सरकारला त्या कुटुंबाला 2 लाख रूपये देण्याची मागणी केली आहे.


डॉक्टरांच्या चुकीची शिक्षा बाळाला
- घटना मलप्पुरम जिल्ह्यातील एका खासगी रूग्णालयातील आहे. आयोगने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, 23 दिवसांच्या बाळावर सर्जरी करण्यात आली ज्यात त्याच्या प्रायव्हेट पार्टचा 75 टक्के भाग कापला गेला. 
- खतना करणाऱ्य़ा डॉक्टरला फक्त 3 वर्षांचा अनुभव होता, त्यामुळे बाळाचे हे हाल झाले आणि रूग्णालयातही सुविधा नसल्याचे आढळले. 
- आयोगाचे सदस्य पी. मोहनदासने राज्यच्या मुख्य सचिवाला बाळाच्या कुटुंबाला 2 लाख रूपये भरपाऊ देण्याची मागणी केली आहे त्यासोबत आरोग्य विभागाला याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...