आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे झाले निधन; नातवाच्या जन्मासाठी हवे होते स्पर्म, सुप्रीम कोर्टाने दिली मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- येथे स्कीइंगदरम्यान अपघात होऊन मिल्ट्री कॅडेटचा मृत्यू झाला होता. कॅडेटच्या पालकांनी नातवासाठी आपल्या मृत मुलाचे फ्रोजन(जमलेले) स्पर्म्स मागितले आहेत. सुप्रीम कोर्टाने याची मंजुरी दिली. 

 

कॅलिफोर्नियाच्या कोनराडमध्ये राहणाऱ्या पीटर झोऊ(21) याच वर्षी फेब्रुवारीमद्ये मिल्ट्री अॅकेडमीमध्ये स्कीइंगदरम्यान पाठीच्या हाडात गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. पीटर आपल्या आई-वडिलांसाचा एकुलता एक मुलगा होता. पालकांना पीटरचे स्पर्म्स त्याच्या अवयवदान सर्जरीदरम्यान मिळाले होते. आता त्याचे पालक स्पर्म्सला एखाद्या महिलेच्या गर्भात टाकण्यासाठी किरायाची आई(सरोगेट मदर) मिलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


कोर्टाने दिली मंजुरी
सुप्रीम कोर्टाचे जस्टिस जॉन कोलान्गेलोने आपल्या निर्णयात लिहीले- यासाठी आण्हाला कोणतीच समस्सा नाहीये. पीटरचे आई-वडील आपल्या नातवासाठी मुलाचे स्पर्म्स वापरू शकतात. मला नाही वाटत की यासाठी कायद्यात कोणती कलम असेल. हे प्रकरण अपवादात्मक आहे. पीटरने मृत्यूपूर्वी असे कुठेही लिहीले नाहीये की, त्याच्या जाण्यानंतर त्याचे अवयव वापरू शकणार नाहीत.


'5 मुले व्हायला हवेत'
पीटरच्या पालकांनी सांगितले की, आमचे मुलासोबत बोलणे झाले होते. आम्ही त्याला सांगितले होते की त्याला पाच मुले व्हायला हवेत. पीटरचा मृत्यू आमच्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. आम्ही यासाठी तयार नव्हतोत. आता आम्हाला त्याचे एखादी निशाणी हवी आहे, म्हणजे आम्हाला त्याची आठवण येणार नाही. 


हा आहे नियम
अमेरिकन सोसायटी फॉर रीप्रोडक्टिव मेडिसिनने 2018 मध्ये गाइडलाइन जारी केल्या होत्या. त्यानुसार- जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने मरण्यापूर्वी जेनेटिक मटेरियलच्या वापराचे बोलले आहे, तर असे होऊ शकते. नाहीतर अर्जाला पती जिंवत असेल तरच ग्राह्य धरले जाईल.

बातम्या आणखी आहेत...