आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार राष्ट्रीय स्तराचा असतो, स्थानिक कामांसाठी नव्हे - परेश रावल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - पूर्वी अहमदाबाद मतदारसंघातून सातवेळा विजयी झालेले उमेदवार हरिन पाठक यांचा पत्ता कटवून भाजपने यावेळी येथून चित्रपट अभिनेता परेश रावल यांना तिकिट दिले आहे. सुरूवातीला हरिन पाठक यांच्या सर्मथकांनी परेश रावल यांना विरोध केला. मात्र नंतर भाजप पक्षर्शेष्ठींनी हरिन पाठक यांची मनधरणी केली. आता परेश रावलही संपूर्ण तयारीनिशी निवडणूक प्रचारात उतरलेले आहेत. बाहेरील उमेदवार अशा आरोपाचा सामना करणारे परेश रावल यांच्याशी भास्कर ने थेट संवाद साधला.

- हरिन पाठक यांच्याऐवजी आपल्याला तिकिट देण्यात आले. ते काय अजूनही नाराज आहेत. तुमत्या प्रचारात ते दिसत नाहीत? :
उत्तर : मी तर एवढंच जाणतो की, मला तिकिट मिळाले आहे. कोणाला तिकिट नाही मिळाले, अन् कोण नाराज आहे हा माझ्यासाठी चिंतेंचा विषयच नाही. हरिनभाई पक्षाचे एक अनुभवी नेते आहेत. मी अजून त्यांना भेटलेलो सुद्धा नाही. ते सध्या दिल्लीत आहेत. ते प्रचारात का उतरलेले नाहीत, याची कल्पना मला तरी नाही.

- तुम्हाला तिकिट मिळाल्याचे कारण काय असावे?.
उत्तर : एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कदाचित माझेल मूल्यमापन मोदीं यांनी केले असावे. माझा प्रयत्न असेन की, मी त्यांच्या विश्वासाला खरा उतरेन.

- मात्र तुम्ही तर भाजपशी कधी जोडलेल नव्हते. फक्त 2012 च्या विधानसभा निवडणुकीत काही भाषणे केली होती. काय याच एका निकषावर तुम्हाला तिकिट मिळालंय?
उत्तर : हे बघा, विरोधक तर काही पण म्हणत असतात. मला वाटते की, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जसा विकास केला आहे, तसाच तो देशभरातही करतील. त्यामुळेच मी त्यांना पाठिंबा दिला आहे.

- तुम्हाला जेव्हा तिकिट मिळाले, तेव्हा असे म्हटले गेले की, तुम्ही बाहेरील आहात. तुम्हाला या भागाची काहीएक फिकिर नसेल.
उत्तर : हे बघा, एक गोष्ट सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे की, खासदाराने स्थानिक समस्या सोडविणे अपेक्षित नाही. जशा की, गटारीचे झाकण चोरीला गेले आहे वगैरे. त्यांचे काम तर देशपातळीवरील असते. राष्ट्रीय धोरण ठरवायचे असते. जर तुम्ही गटारीच्या झाकणासाठी खासदाराला दोषी ठरवाल तर ते चुकीचे असेल.

- तुम्ही जिंकलात तर हा विजय मोदी यांच्या कारणामुळे की पक्षामुळे असेल?
उत्तर : मी खूप नवीन आहे. माझ्यावर जो विश्वास दाखविण्यात आला आहे, तोच माझ्यासाठी खूर मोठी बाब आहे. जिंकलोच तर मोदी आणि पार्र्टी या दोन्ही कारणांमुळेच.

- खासदार बनलात तर चित्रपटसृष्टी सोडेणार काय ?
उत्तर : चित्रपट आणि नाटकात कामे मी पैसे कमावण्यासाठी करीत असतो. राजकारणात मी पैसे कमावण्यासाठी आलेलो नाही. तो धंदा मी करणार नाही. माझ्याकडे त्यासाठी चित्रपट, नाटकच असेल.