आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

 'बमफाड' चित्रपटातून अनुराग करणार परेश रावलच्या मुलाला लाँच, दिग्दर्शकाने दिली होती या स्टार किडला डेडलाइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्णः बॉलिवूडमध्ये या वर्षाअखेर आणखी एका स्टार किडची एंट्री होणार आहे. तो परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल आहे. त्याला अनुराग कश्यप लाँच करणार आहेत. हा एक रोमँटिक चित्रपट आहे, त्याचे नाव 'बमफाड' आहे. विशेष म्हणजे आदित्य गुजराती आहे आणि चित्रपटाची पार्श्वभूमी अलाहाबाद आहे. त्यामुळे त्याला उत्तर प्रदेशासारखे बोलण्यासाठी चार महिने मेहनत घ्यावी लागणार आहे. या चित्रपटात आदित्यच्या मित्राच्या भूमिकेत 'सेक्रेड गेम्स' फेम जतीन सरना दिसणार आहेत, तर खलनायकाची भूमिका 'गली बॉय' फेम विजय वर्मा साकारणार आहे. 

तीन ते चार महिन्यांची डेडलाइन दिली होती 
हा चित्रपट दिग्दर्शक रंजन चंदेल दिग्दर्शित करणार आहेत. त्यांनी आदित्यला डेडलाइन दिली होती. ते म्हणाले, आदित्य गुजराती आहे, मात्र त्याने अलाहाबादची बोली आत्मसात केली आहे. त्याला स्वत: मी प्रशिक्षण दिले आहे. कारण मी स्वत: कानपूरचा आहे. मी त्याला असेच घेतले नाही. त्याला मी तीन ते चार महिन्यांची डेडलाइन दिली होती. या वेळेत तू चांगला बोलू शकला नाही तर तुझ्या जागी दुसऱ्याला घेण्यात येईल, असे त्याला स्पष्ट सांगण्यात आले होते. मात्र तशी वेळ आली नाही. आता तो चित्रपटात इतक्या चांगल्या प्रकारे अलाहाबादी बोलतो आहे की, कुणालाच आदित्य गुजराती असल्याचा विश्वास होणार नाही. 

शालिनी करणार पदार्पण 
या चित्रपटात आदित्यसोबत शालिनी पांडे दिसणार आहे. यापूर्वी तिने दक्षिणेतील हिट चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मध्ये काम केले आहे. हिंदीत शालिनीचा हा पहिला चित्रपट ठरेल. कारण ती मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणार आहे. त्यामुळे तिला अलाहाबादी तरुणीची भूमिका करण्यात आणि तिची भाषा बोलण्यात जास्त अडचण झाली नाही. दुसरीकडे खलनायक विजय वर्मादेखील अलाहाबादच्या पार्श्वभूमीवर बनलेला 'हुड़दंग' करत आहेेत. 

अशी केली आदित्यने तयारी... 

  • चित्रपटाच्या शूटिंगआधी दिग्दर्शक रंजनने स्वत: आदित्यसोबत बसून तीन-चार महिने कथा वाचन केले.
  • या वाचनामुळे आदित्यला अलाहाबादची भाषाशैली कॅच करण्यात मदत झाली.
  • उत्तर प्रदेशातील मुलांचे चालणे-बोलणे आणि मन जाणून घेण्यासाठी आदित्यने कानपूरच्या डीएव्ही कॉलेजात तरुणांसोबत वेळ घालवला.

ही आहे कथा 
या चित्रपटाची कथा अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. या कुटुंबातील मुलांना प्रेमावर बोलण्यासही बंदी आहे. आदित्य यात ठेकेदाराच्या मुलाच्या भूमिकेत आहे. रंजन चंदलने यात अलाहाबादमधील विद्यार्थी राजनीती आणि तेथील संवादबाजी ठेवली नाही. त्यांचा फोकस तेथील तरुणावर आहे. याचे शूटिंग पूर्ण झाले आहे.