आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परेश रावल यांचे लवकरच मराठी नाट्यसृष्टीत पदार्पण, घेऊन येत आहेत गुजराती नाटक आता मराठीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेते परेश रावल आता लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहेत. परेश रावल यांचे प्रसिद्ध नाटक 'महारथी' आता मराठीमध्ये लोकांसमोर येणार आहे. मात्र या नाटकामध्ये परेश रावल अभिनय करणार नसून ते या नाटकाची निर्मिती करत आहेत. या नाटकामध्ये मराठी अभिनेता सचित पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचितने आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबद्दल माहिती दिली आहे. १५ ऑगस्टला हे नाटक मंचावर येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या नाटकाची तालीम सुरु आहे. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी इंदूरहून मुंबईत आलेल्या एका तरुणाच्या महत्वकांक्षेची ही कथा आहे.  

बातम्या आणखी आहेत...