आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण, नाना पटोले यांच्यासह पुतण्या आणि समर्थकांवर गुन्हे दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. परिणय फुके - Divya Marathi
डॉ. परिणय फुके

भंडारा - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साकोली येथे घडली.  डॉ. परिणय फुके यांचे लहान बंधू नितीन फुके हे प्रकाशपर्व पोस्ट ऑफिस जवळ साकोली या त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही साथीदारांनी नितीन यांना घेरले आणि मारहाण करीत वाहनात कोंबले. तेथून हे  नितीन यांना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथेही त्यांना जबर मारहाण केली.  या हल्ल्यात नितीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या नितीन फुके यांनाच पटोले यांच्या गुंडांनी अंधारात पालकमंत्री समजून घेरले आणि जबर मारहाण केली. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात रात्री नाना पटोले आणि त्यांच्या 30-40 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...