Home | News | Parineeti Chopra Demands 5 Million Dollar From Nick Jonas Shoe Hiding Fee

परिणिती चोप्राने भाऊजी समोर पुन्हा केली मागणी, म्हणाली - बुट चोरल्यानंतर 37 कोटी देणार की नाही?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 01:13 PM IST

निक म्हणाला - मी फक्त 10 डॉलर देणार

  • Parineeti Chopra Demands 5 Million Dollar From Nick Jonas Shoe Hiding Fee

    एन्टटेन्मेंट डेस्क. परिणिती चोप्रा आणि तिचे होणारे भाऊ यांच्यामध्ये आता थट्टा मस्करी सुरु आहे. परिणितीने पुन्हा एकदा भाऊजी निक जोनाससमोर बुट चोरण्याच्या बदल्यात 5 मिलियन डॉलर(37 कोटी) रुपये देण्याची मागणी केली आहे. यावेळी परिणितीने संपुर्ण जगासमोर ही मागणी केली आहे. प्रियांकाने नुकतीच बॅचलरेट पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील प्रियांकासोबतचा फोटो परिणितीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघीही मस्ती मूडमध्ये दिसत आहेत.


    फोटो पाहून पीसीने होणा-या पतीला कमेंट केली आहे.
    - परिणितीने शेअर केलेल्या फोटोवर तिचा होणारा भाऊजी निकने प्रियांकाला पाहून कमेंट केली आहे. तो म्हणाला की, 'ही खुप सुंदर आहे, कुणी हिची ओळख करुन देईल का' यावर परीने उत्तर दिले की, 'हिला मिळवणे अवघड आहे, पण मी प्रयत्न करु शकते, जर तुम्ही मला बुट लपवण्याच्या बदल्यात 5 मिलियन डॉलर(37 कोटी) देण्यास तयार असाल तर'
    - यापुर्वीही परीने आपल्या 'नमस्ते इंग्लँड'च्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने भाऊजी निकला बुट लपवण्याच्या बदल्यात 37 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण तिने हेसुध्दा सांगितले की, निक तिला फक्त 10 डॉलर (730 रुपये) देणार असे बोलला आहे.

Trending