आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parineeti Chopra Seen In Drunken Girl' Role In The Remake Of Movie 'Girl On The Train', Said 'This Is A Very Challenging Role For Me'

इंग्रजी चित्रपट 'गर्ल ऑन द ट्रेन' च्या रीमेकमध्ये परिणीती साकारणार आहे दारुड्या मुलीची भूमिका, म्हणाली - 'माझ्यासाठी ही खूप आव्हानात्मक भूमिका आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : परिणीती चोप्रा आपला आगामी चित्रपट 'गर्ल ऑन द ट्रेन' रीमेकमध्ये करिअरचा सर्वात चॅलेंजिंग रोल साकारणार आहे. ती या चित्रपटात एका दारुड्या मुलीची भूमिका साकारणार आहे. दारूला कधीही हातसुद्धा न लावणारी परिणीती स्वतः म्हणाली की, हा तिच्यासाठी खूप चॅलेंजिंग रोल असेल. परिणीती म्हणाली, ‘मला आठवण करून देऊ नका, मला खूप भीती वाटत आहे. मी आता त्याची तयारी सुरु करणार आहे. हा एक असा रोल आहे जसा मी यापूर्वी कधीही केलेला नाही. मी आता हा विचार करत आहे की, मी सेटवर जाऊन काय करू. हा रोल माझ्यासाठी खूप मोठे चॅलेंज असेल. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होणार आहे आणि मी हा रोल अजिबात सोपा म्हणून घेतलेला नाहीये. मला नेहमीच असा एक चित्रपट करायचा होता.’

 

मेथड अॅक्टिंग करणार आहे परिणीती... 
‘या चित्रपटात मी मेथड अॅक्टिंग करणार आहे. मला एका दारुड्या मुलीची भूमिका साकारायची आहे जे मी आजपर्यंत कधीही केलेले नाही. रिअल लाइफमध्ये मी दारू पित नाही. पण माझ्या प्रोफेशनल लाइफची हीच मजा आहे. येथे मला ते सर्व रोल करण्याची संधी मिळते जे मी यापूर्वी कधीही केले नाही.’ परिणीती या चित्रपटात जो रोल करणार आहे, तो ऑरिजनल चित्रपटात एमिली ब्लंटने साकारला होता. 

 

अशी आहे चित्रपटाची कथा... 
ही कहाणी एका घटस्फोटित तरुणीची आहे, जी लंडनमध्ये राहाते. ती रोज ट्रेनने आपले ऑफिस आणि नव्या घरापर्यंतचा प्रवास करते. योगायोगाने ट्रेन तिच्या जुन्या घरापासूनच जाते, जिथे तिचा एक्स हसबँड दुसरी बायको आणि मुलांसोबत राहातो. एक दिवस प्रवासादरम्यान ती तरुणी ते काहीतरी पहाते जे तिला हैरान करून सोडते. चित्रपट याच इंसीडन्टबद्दल आहे. या रीमेकच्या खऱ्या चित्रपटात लीड अॅक्ट्रेस एमिली ब्लंट होती. 

 

भूमिकांसाठी काय काय करतात कलाकार... 
रणवीर सिंह, 'पद्मावत'

रणवीरने व्हिलन खिलजीचा रोल प्ले केला होता. भूमिकेच्या मूडमध्ये राहण्यासाठी तो सेटवर खूप गंभीर आणि रागात राहायचा. सर्वांशी चिडूनच बोलायचा. 

 

आलिया भट्ट, 'उड़ता पंजाब' 
आलियाने यामध्ये रेप विक्टिमचा रोल प्ले केला होता. भूमिकेमध्ये जाण्यासाठी ती उजाड शेतांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायची. 

 

भूमी पेडनेकर, 'सोनचिड़िया' 
भूमीने गावातील एका महिलेची भूमिका साकारली होती. तयारीसाठी ती रोज दोन किलो गहू दळायचे आणि मग गोणी घेऊन चार किमी चालायची. 

बातम्या आणखी आहेत...