Home | Star Interview | Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit

10 किलो वजन कमी करण्यासाठी खर्च केले 10 लाख रुपये, परिणीतिने स्वतः म्हटले, मी लठ्ठ दिसायचे... अशी झाली Fat to Fit

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 22, 2018, 04:14 PM IST

परी ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास दूध, ब्राउन ब्रेड, दोन अंडी (फक्त पांढरा बलक) आणि कधी-कधी जूस घेते.

 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit

  एंटरटेनमेंट डेस्क - परिणीति चोप्रा आज (सोमवारी) आपला 30 वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. परीचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला, हरियाणा येथे झाला होता. Ladies vs Ricky Behl पासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणीतिने इशकझादे चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळवला होता. अनेकांना ही गोष्ट माहिती नसेल की एकेकाळी परीचे वजन तब्बल 86 किलो होते. तिने स्वतःला फिट करताना 28 किलो वजन घटवले होते. एकेकाळी लठ्ठ दिसणाऱ्याने परीने फिटनेसवर लक्ष दिले आणि आज फॅट टू फिट झाली आहे.


  परिणीतिने फॉलो केले डिफरन्ट स्टाइल...
  - परीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की "मी आपले वजन कमी करण्यासाठी वेगळी स्टाइल फॉलो केली आहे. मी रोज सकाळी जॉगिंग केल्यानंतर ध्यान साधना करते. रोज एक तास योगा करत होते. स्वी‌मिंग किंवा घोडेस्वारी करणे माझे डेली रुटीन बनले होते."
  - ती पुढे म्हणाली, "जिममध्ये ट्रेडमिलवर धावणे आणि डान्स करणे माझ्यासाठी दैनंदिनी ठरली होती." ती एक तास केरळचे मार्शल आर्ट्स कलारीपयट्टू सुद्धा करत होती. परी आजही आपल्या फिटनेसवर लक्ष देते आणि हेच डेली रुटीन फॉलो करत आहे.
  - 25 वर्षांची असताना आपण खूप जाड झाले होतो. तिला कुठलेही कपडे फिट बसत नव्हते. स्वतःची ही अवस्था पाहून ती वैतागली होती. कुठल्याही परिस्थितीत फिट व्हायचेच असे तिने ठरवले आणि तेव्हापासूनच फिटनेसवर लक्ष देण्यास सुरुवात केली.


  असा आहे परीचा डायट चार्ट
  - परी ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास दूध, ब्राउन ब्रेड, दोन अंडी (फक्त पांढरा बलक) आणि कधी-कधी जूस घेते.
  - लंचमध्ये ती डाळ-चपाती, ब्राउन राइस, ग्रीन सॅलड, हिरव्या पालेभाज्यांचा जूस असा आहार घेते.
  - डिनरमध्ये ती तळलेले सादे जेवण, एक ग्लाल दूध आणि कधी-कधी चॉकलेट शेक पिते. झोपण्याच्या किमान 2 तासांपूर्वी डिनर घेणार हे ठरलेले आहे.


  10 किलो कमी करण्यासाठी खर्च केले 10 लाख रुपये
  मीडिया रिपोर्ट्सनुसार, परी आपले वजन कमी करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले होते. तिने ऑस्ट्रियामध्ये डिटॉक्स प्रोग्रॅम जॉइन केला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारचे टेस्ट केले जातात. जेणेकरून शरीर काय-काय सहन करू शकते याचा पत्ता लागेल. त्याच आधारावर 6 महिन्यांचा डायट चार्ट तयार केला जातो. हा चार्ट डायट करणाऱ्यांना फॉलो करावाच लागतो. या डायट चार्टची किंमत 5 ते 10 लाख रुपये आहे. तसेच एकूण किंमत किती राहील हे त्या संपूर्ण प्रक्रियेवर विसंबून आहे. परिणीतिने हाच डायट प्रोग्राम फॉलो केला आणि चांगले परिणाम दिसून आले असे तिने स्वीकारले आहे.

 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit
 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit
 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit
 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit
 • Parineeti Chopra Weight Loss Secret Went From Fat To Fit

Trending