आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे दोघं सध्या चर्चेत आहे. कारण या दिर्घकाळापासून लाइमलाइटमध्ये राहणा-या या जोडप्याच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. प्रियांकाच्या मुंबईतील राहत्या घरी तिची रोका सेरेमनी पार पडली. या पूजेत प्रियांकाच्या कुटुंबीयांसोबतच निकचे आईवडील सहभागी झाले होते. यानंतर त्यांची एंगेजमेंट पार्टी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडली. अर्थातच प्रियांका आता तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतेय. ती आता जोनास कुटूंबियांची सुन होणार आहे. या दोघांनाही सर्वांनीच नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राही यावेळी उपस्थीत होती. तिने अनोख्या अंदाजात भावनिक होऊन आपल्या बहिणीला शुभेच्छा दिल्या.
बालपणीच्या आठवणी केल्या ताज्या
परिणीतीने बहिणीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणाली की, "कळत नकळत आपण लहानपणी जो खेळ खेळायचो, लाजऱ्या नवरीप्रमाणे वावरायचो, एका राजकुमाराची वाट पाहायचो… तसंच काहीसं प्रियांकासोबत आज प्रत्यक्षात घडत आहे. निक हा प्रियांकासाठीसर्वतोपरी उत्तम आणि साजेसा मुलागा आहे. आता यापुढे निकने प्रियांकाची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्याला केली आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.