आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सायना नेहवाल’वर लवकरच काम सुरू करणार परिणीती चोप्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - परिणीती चोप्रा नुकतीच लंडनवरुन परतली आहे. लंडनमध्ये ती सात आठवड्यांपासून आपल्या आगामी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. आता ती पुढच्या आठवड्यापासून सायना नेहवालच्या बायोपिकवर काम सुरु करणार आहे. 

सूत्राच्या मते, परिणीती बऱ्याच दिवसांपासून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत होती. या चित्रपटासाठी फिजिकल ट्रेनिंगदेखील घ्यावी लागली. तिने याची तयारी ४ ते ५ महिन्यापासून सुरू केली होती. आता निर्माते पुन्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू करू इच्छित आहेत. परिणीती बॅडमिंटनच्या सरावासोबत वर्कआउटदेखील करत आहे.  सायनाच्या पात्रासाठी तिला धावपटूसारखी बॉडी बनवायची आहे. तिच्या टीमने प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू केले आहे.