आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांच्या’ वयाचा हिशेब समजण्यापलीकडचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून एक नवा वाद निर्माण झाला आहे की, बादल यांचे नेमके वय किती आहे? बादल यांनी जी कागदपत्रे दिली आहेत त्यात त्यांनी आपले वय 84 वष्रे सांगितले आहे. तथापि पाच वर्षांपूर्वी सत्ता हातात घेताना त्यांनी आपले वय 76 वष्रे सांगितले होते. म्हणजेच मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांचे वय तीन वष्रे वाढले. असे एकदा घडले असते तर ते समजू शकले असते; पण 2002 मध्ये त्यांनी वयासंबंधी दिलेला अजून एक दाखला त्यांचे निकटवर्तीय मनप्रीत बादल यांनी सादर केला आहे. 2002 मधील या कागदपत्रांवरून बादल त्यावेळी 80 वर्षांचे होते आणि या हिशेबाने त्यांचे वय 91 वष्रे असायला हवे. अनेक ठिकाणी त्यांची जन्मतारीख 8 डिसेंबर 1927 लिहिलेली आहे; पण सध्या ते आपले वय कमी असल्याचे सिद्ध करण्यात गुंतले आहेत.