Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | parkinson disease symptoms information in marathi

का होतो पार्किन्सन्स आजार? असे ओळखा याचे संकेत

हेल्थ डेस्क | Update - Dec 07, 2018, 12:57 PM IST

पार्किन्सन्स आजारावर कायमचा उपचार नाही. परंतु योग्य वेळी यावर उपचार घेतले तर ही समस्या कमी केली जाऊ शकते.

 • parkinson disease symptoms information in marathi


  पार्किन्सन्स एक असा आजार आहेत, जो 55 वर्षे वयाच्या वरच्या व्यक्तीला होतो. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. या आजारावर कायमचा उपचार नाही. परंतु योग्य वेळी यावर उपचार घेतले तर ही समस्या कमी केली जाऊ शकते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, दिल्लीचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. पी. एन. रेनजन पार्किन्सन्स आजार म्हणजे काय आणि काय आहेत याचे संकेत याविषयी सांगत आहेत...


  कसा होतो पार्किन्सन्स आजार? : मेंदूमधील सेल्स खराब झाल्यामुळे डोपामाइन हार्मोन कमी होतात. अशा वेळी मेंदू शरीराच्या भागाला सिग्नल देऊ शकत नाही. यामुळे पार्किन्सन्स डिसिजची समस्या होते.


  पार्किन्सन्स डिसिजमध्ये काय होते? : पार्किन्सन्स डिसिज झाल्यावर मेंदूचे फंक्शन्स योग्य प्रकारे काम करी शकत नाही. अशा वेळी शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नाही.


  पार्किन्सन्स अाजार काय आहे? : पार्किन्सन्स आजार एक न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर (मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होणे) आहे.


  पार्किन्सन्सचे संकेत
  - दीर्घकाळ हात, बोट आणि खांद्यामध्ये कंप (थरथरणे) होणे.
  - हात-पायांची हालचाल कमी होणे.
  - स्नायूंमध्ये कडकपणा आल्यामुळे वेदना होणे.
  - शरीराचा आकार बिघडणे.
  - शरीराला संतुलित ठेवता न येणे.
  - बोलण्यात अडथळा येणे.
  - उदासीनतेची समस्या राहणे.

Trending