आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

GST Effect : 'पार्ले-जी'समोर आर्थिक संकट; कंपनीच्या 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 90 वर्षे जुनी असलेली देशातील सर्वांत मोठी बिस्किट कंपनी 'पार्ले-जी' अडचणीत सापडली आहे. कंपनी आपल्या 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. जीएसटीपूर्वी बिस्किटांवर 12 टक्के टॅक्स द्यावा लागायचा. पण जीएसटी लागू झाल्यानंतर यात वाढ होऊन 18 टक्के टॅक्स द्यावा लागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने यावर उपाय केली नाही तर पार्ले-जी कंपनीला तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे. 

...तर कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार
विक्री घटल्यामुळे कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान 100 किलोपेक्षा कमी म्हणजे 5 रुपयांखालील बिस्कीट उत्पादनांवरील सेवा कर कमी करावा अशी मागणी कंपनीने सरकारकडे केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर विविध ठिकाणचे 8 ते 10 हजार कर्मचारी कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

'पार्ले-जी'ची वार्षिक उलाढाल जवळपास 10 हजार कोटींच्या आसपास आहे. कंपनीचे देशभरात 10 प्लांट आणि 125 थर्ड पार्टी निर्मिती युनिट्स आहेत. या कंपनीत अंदाजे 1 लाख कर्मचारी काम करतात. पार्लेचे निम्म्यापेक्षा जास्त ग्राहक ग्रामीण भागात आहे. 

कंपनीसमोर आर्थिक संकट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी लागू होण्यापूर्वी प्रतिकिलो 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बिस्किटांवर 12 टक्के कर लागत होता. त्यामुळे GST लागू झाल्यानंतर करांचे दर हे 5 टक्क्यांपर्यंत खाली येतील अशी कंपनीला आशा होती. परंतु, सरकारने जीएसटी लागू केल्यावर सर्व बिस्किटांचा 18  टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समावेश  केला. यामुळे कंपनीचे उत्पादन शुल्कही वाढले. परिणामी, उत्पादनाची दरवाढ करणे हा एकमेव पर्याय कंपनीसमोर राहिला. मात्र, त्याचा कंपनीच्या उत्पादन विक्रिवर परिणाम झाला. पार्लेने आपल्या उत्पादनांची किंमत 5 टक्क्यांनी वाढवली. पण विक्रीत घट कायम राहिल्याने कंपनीसमोर आर्थिक संकट उभे राहिले.

0