आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपूर्ण देशात एनआरसी लागू केली जाईल, कोणत्याच धर्मातील नागरिकांनी चिंता करू नये- अमित शाह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज संसदेत संपूर्ण देशात एनआरसी लागू केली जाईल, असे जाहीर केले. तसेच, कोण्यात एका धर्मातील नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. राज्यसभेत बोलताना शाह म्हणाले की, एनआरसी मध्ये धर्माच्या आधारे लोकांना बाहेर करण्याचा कोणता विचार नाहीये. जर कोणाचे नाव एनआरसीमधून बाहेर केले असेल, तर त्यांना ट्रिब्यूनलमध्ये अर्ज करण्याचा अधिकार आहे. जर कोणाकडे यासाठी पैसे नसतील, तर असाम सरकार त्यांच्यासाठी वकीलाची सोय करतील. असाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या दहशतवादी हालचाली सुरूच असल्याने सुरक्षेची काळजी घ्यावी लागते


ज्यसभेत विरोधी पक्षाने बुधवारी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी तेथील परिस्थिती सभागृहात मांडली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरात 5 ऑगस्टनंतर पोलिसांच्या गोळीने एकही मृत्यू झालेला नाही असा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. इंटरनेटबद्दल बोलताना ते म्हणाले, की या ठिकाणी इंटरनेट बंदी यापूर्वीही लागू करण्यात आली होती. इंटरनेट बंदी जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाला विचारूनच लागू केली जाईल. काश्मीरात पाकिस्तानकडून दहशतावादी हालचाली सुरूच राहतात. त्यामुळे, आम्हाला सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते.

गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्यावरून काँग्रेसचा आक्षेप
 
तत्पूर्वी राज्यसभेत गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ घातला. काँग्रेसने हा मुद्दा चर्चेत उपस्थित केला. त्यावर बोलताना, गांधी कुटुंबियांची सुरक्षा काढण्याचा निर्णय सरकार आणि गृहमंत्रालयाने घेतला आहे. हा निर्णय काही एका नेत्याने घेतलेला नाही असे भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी सांगितले. काँग्रेस नेत्यांनी या निर्णयामागे पक्षापातीचा आरोप केला होता. परंतु, भाजपने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला. कुठल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची सुरक्षा देण्यात यावी हे सर्वस्वी त्यांना असलेल्या धोक्यावरून ठरवले जाते. त्याच आधारे एखाद्या व्यक्तीला सुरक्षा दिली आणि परतही घेतली जाते असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...